Join us

अमेरिकन फॅशन ब्रॅण्डने दिली खादीला पसंती; जगभरात डंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:44 AM

महागड्या ड्रेसेससाठी हस्तनिर्मित खादी डेनिमचा वापर

अहमदाबाद : भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या खादीला आता परदेशामध्येही मोठी मागणी येत असून अमेरिकेच्या सुप्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डनेही खादीला पसंती दिली आहे. शुद्धता आणि मजबुती असे दोन्ही गुण असलेली खादी आता परदेशातही मिरवताना दिसून येणार आहे.अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्ड असलेल्या पेटागोनियाने आपल्या महागड्या ड्रेसेसच्या निर्मितीमध्ये हाताने तयार केलेल्या डेनिमचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातमधून खादी डेनिमची खरेदी केली आहे. मागील वर्षीच या कंपनीच्या एका प्रतिनिधी मंडळाने गुजरातमधील राजकोटचा दौरा करून तेथे खादीच्या उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली . त्यानंतर याबाबतचा करार झाला आहे.खादी ग्रामोद्योग महामंडळाने जगभरामध्ये खादीचा प्रसार करण्याची योजना आखली असून त्यासाठी सन २०१७ च्या जुलै महिन्यात गुजरातमधील एका कंपनीबरोबर करार केला आहे. त्यानुसार सदर कंपनी जगभरातील विविध कंपन्यांना खादी विकत आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातून भारताच्या खादीला मागणी वाढत असलेली दिसत आहे.रोजगारामध्ये झाली वाढपेटागोनियाने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये खादी डेनिमच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली होती. त्यामुळे गुजरातमधील कारागिरांना २७,७२० मानवी दिवसांचा जादाचा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचा लाभ कामगारांच्या उत्पन्नवाढीमध्ये तसेच रोजगार संधींच्या वाढीने झाला आहे.

टॅग्स :अमेरिकाखादी