Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकन फर्मने अदानींच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली! ब्लॉक डीलद्वारे शेअर्सची पुनर्खरेदी केली, ५.०३% हिस्सा

अमेरिकन फर्मने अदानींच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली! ब्लॉक डीलद्वारे शेअर्सची पुनर्खरेदी केली, ५.०३% हिस्सा

अदानी पॉवरमध्ये ४२४२ कोटींची गुंतवणूक केल्यानंतर अमेरिकन फर्म GQG पार्टनर्सने अदानी पोर्टमध्ये बंपर गुंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 11:11 AM2023-08-20T11:11:06+5:302023-08-20T11:12:28+5:30

अदानी पॉवरमध्ये ४२४२ कोटींची गुंतवणूक केल्यानंतर अमेरिकन फर्म GQG पार्टनर्सने अदानी पोर्टमध्ये बंपर गुंतवणूक केली आहे.

American firm increased investment in Adani's company Shares repurchased through block deal, 5.03% stake | अमेरिकन फर्मने अदानींच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली! ब्लॉक डीलद्वारे शेअर्सची पुनर्खरेदी केली, ५.०३% हिस्सा

अमेरिकन फर्मने अदानींच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली! ब्लॉक डीलद्वारे शेअर्सची पुनर्खरेदी केली, ५.०३% हिस्सा

अदानी समुहासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. तरीही गुंतवणूकदारांचा समूहावरील विश्वास कायम आहे, बाहेरच्या देशातील गुतंवणूकदारांचाही विश्वास वाढला आहे. विदेशी गुंतवणूकदार अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहेत. अमेरिकन गुंतवणूकदार GQG पार्टनर्सने गौतम अदानी समूहातील मोठ्या कराराद्वारे अदानी पॉवरमधील ३.९ टक्के भागभांडवल विकत घेतले. 

शेअर बाजारात मालामाल होणे म्हणजे नेमके काय?

३ दिवसांनंतर अमेरिकन फर्मने पुन्हा अदानी पोर्टमधील ०.०१ स्टेकमध्ये २२ लाख शेअर्स खरेदी केले. या करारानंतर, GQG फर्मने अदानी पोर्टमधील आपली भागीदारी ५.०३% पर्यंत वाढवली आहे. अदानी पॉवरमध्ये ४२४२ कोटींच्या गुंतवणुकीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये बंपर तेजी आली होती.

डेलॉइटने अदानी पोर्ट्सच्या ऑडिटरच्या पदाचा राजीनामा दिला असतानाच अमेरिकन फर्म GQG पार्टनर्सने अदानी पोर्टमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. त्यामुळे ही गुंतवणूक कंपनीसाठी महत्त्वाची आहे. शेअर बाजारांना दिलेल्या माहितीमध्ये, अदानी पोर्ट्सने सांगितले आहे की GQG पार्टनर्सने पुन्हा एकदा २२ लाखांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यानंतर अदानी पोर्ट्समधील अमेरिकन कंपनीची हिस्सेदारी ४.९३ टक्क्यांवरून ५.०३ टक्क्यांवर पोहोचली आहे.

अमेरिकन फर्म GQG पार्टनर्सने बुधवारी अदानी पॉवरमधील ८.१ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. यासाठी अदानी समूहाने १.१ अब्ज डॉलर दिले होते.

Web Title: American firm increased investment in Adani's company Shares repurchased through block deal, 5.03% stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.