Hindenburg Research: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) आणि त्याचा संस्थापक नॅट अँडरसन (Nathan Anderson) अडचणीत सापडले आहेत. कॅनडातील ओंटारियो येथील न्यायालयीन लढाईत हिंडेनबर्ग रिसर्च आणि नॅट अँडरसन यांच्याविरोधात ठोस पुरावे समोर आले आहेत. यात हिंडेनबर्गचे गुप्त संबंध आणि कंपनी तसंच अँडरसननं केलेली संभाव्य सिक्युरिटी फ्रॉड उघड झाली आहे. हिंडेनबर्गनं अलीकडेच अचानक हिंडेनबर्गचे ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.
कॅनडास्थित इन्व्हेस्टिगेटिव्ह न्यूज आउटलेट मार्केट फ्रॉड्सनं दिलेल्या वृत्तानुसार, नॅट अँडरसन आणि अॅन्सन फंड्स या दोघांविरोधात सिक्युरिटीज फ्रॉडची अनेक प्रकरणं आहेत. हिंडेनबर्ग आणि अॅन्सन यांच्यातील संपूर्ण देवाणघेवाण एसईसीपर्यंत पोहोचल्यानंतर २०२५ मध्ये नॅट अँडरसनवर सिक्युरिटी फ्रॉडचा गुन्हा दाखल होईल हे जवळपास निश्चित आहे, असं अहवालात म्हटलंय.
ब्लूमबर्गच्या क्रॅक रिसर्च टीमने नोव्हेंबर २०२४ मध्ये एक विस्तृत अहवाल प्रकाशित केला, जो हिंडेनबर्गसह विविध शॉर्ट-सेलर आणि रिसर्च फर्ममागील बाबी उघड करणारा मालिकेतील पहिला अहवाल आहे. 'शॉर्ट सेलर्स सीक्रेट टॉक्स अँड अलायन्स इमर्ज इन कोर्ट बॅटल' नावाच्या या अहवालात हिंडेनबर्ग रिसर्च आणि कॅनडास्थित अॅन्सन फंड्स सारख्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.
हिंडनबर्गकडून आरोपांचं खंडन
हिंडनबर्गनं आरोपांचं खंडन करत ब्लूमबर्गला, त्यांना दरवर्षी वेगवेगळ्या सोर्सकडून शेकडो लीड्स मिळत असल्याचं सांगितलं. प्रत्येक लीडची काटेकोरपणे छाननी करतात आणि त्यांच्या कार्याबद्दल नेहमीच संपूर्ण स्वातंत्र्य राखतात, असंही सांगण्यात आलं. लेखानंतर अँडरसनने अॅन्सन किंवा इतर कोणाशीही भागीदारी केल्याची बाब नकाराली.
अदानींवरही आरोप
अदानी समूहानं शॉर्ट सेलरला न्यायालयात नेण्याऐवजी त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्यांचा सामना करण्यासाठी आपल्या परदेशी इंटेलिजन्स पार्टनर्ससोबत एक गुप्त तपास सुरू केल्याचे संकेत सूत्रांनी दिले. हिंडनबर्गनं अदानी समूहाविरोधात जानेवारी २०२३ मध्ये पहिला रिपोर्ट जारी केला होता. अदानी समूहावरील आरोपांमागील अॅन्सनची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.