नवी दिल्ली : अमेरिकेकडून भारतात प्रथमच कच्चे तेल घेऊन अमेरिकेचे व्हेरी लार्ज क्रूड कॅरीयर (जहाज) सोमवारी ओडिशातील पारादीप बंदरात दाखल होईल.
या तेलाची मागणी इंडियन आॅइल कार्पोरेशनने गेल्या जुलैमध्ये पहिल्यांदाच नोंदविली होती. या तेलामुळे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्यांनादेखील अमेरिकेकडून कच्चे तेल घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. हे जहाज १.६ दशलक्ष बॅरल्स अमेरिकन कच्चे तेल घेऊन, रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी सकाळी दाखल होईल, असे इंडियन आॅइल कार्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी सांगितले. हे जहाज एका वेळी दोन दशलक्ष बॅरल्स तेलाची वाहतूक करू शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा वाजवीपेक्षा जास्त पुरवठा वाढल्यामुळे, स्वस्त पर्यायाचा शोध घेताना, भारत सरकारने आपल्या मालकीच्या तेल कंपन्यांना अमेरिका आणि कॅनडाचे कच्चे तेल घेण्यास प्रोत्साहन दिले आहे.
अमेरिकेचे कच्चे तेल प्रथमच आज भारतात येणार
अमेरिकेकडून भारतात प्रथमच कच्चे तेल घेऊन अमेरिकेचे व्हेरी लार्ज क्रूड कॅरीयर (जहाज) सोमवारी ओडिशातील पारादीप बंदरात दाखल होईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:15 AM2017-10-02T02:15:20+5:302017-10-02T02:15:26+5:30