Amit Shah On Share Market Crash : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी(दि.13 ) देखील शेअर बाजार उघडताच कोसळला. सेन्सेक्स 700 अंकांनी, तर निफ्टी 200 अंकांनी घसरले. दरम्यान, या बाजारातील या चढ-उताराशी निवडणुकीचा काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले अमित शाह?
एका मुलाखतीदरम्यान अमित शाह म्हणाले, शेअर बाजारातील घसरणीचा निवडणुकीशी संबंध जोडू नये. 4 जून 2024 नंतर शेअर बाजार वाढणारच आहे. शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 16 वेळा शेअर बाजार कोसळला आहे, त्यामुळे त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जाऊ नये. 4 जूनपूर्वी खरेदी करा, कारण त्यानंतर बाजार वाढणारच आहे, असे भाकितही त्यांनी केले.
अमित शहा पुढे म्हणतात, देशात जेव्हा जेव्हा स्थिर सरकार येते, तेव्हा बाजारात तेजी असते आणि आमच्या जागा 400 येणार आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी सरकार येईल आणि बाजारातही तेजी पाहायला मिळेल.
भाजपच्या विजयामुळे बाजार वाढणार?
PhillipCapital ने बाजार आणि त्याच्या निवडणूक संबंधाबाबत एक नोट जारी केली आहे. त्यात म्हटले की, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या, तर शेअर बाजार जोरदार वाढेल. एनडीएने 300-330 जागा जिंकल्या, तर त्याचा बाजार घसरू शकतो. तर Mirae Asset Capital Markets ला देखील अपेक्षा आहे की, शेअर बाजारात वाढ नक्की होईल.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)