Join us

Amitabh Bhachchan Share Market Investment: अमिताभ बच्चन मालामाल बनले; पाच वर्षांपूर्वीचा आयपीओ, ७५ रुपये शेअरची किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:38 PM

सप्टेंबरच्या अखेरीस हा शेअर लिस्ट झाला होता. तेव्हापासून अमिताभ यांचा शेअर होल्डिंग 2.45% म्हणजेच 13,41,18,400 एवढी झाली आहे.

कौन बनेगा करोडपतीतून लोकांना करोडपती बनविणाऱ्या अमिताभ बच्चन यांना त्यांनी घेतलेले शेअर्स करोडपती बनवत आहेत. खरेतर अमिताभ यांनी केलेली स्मार्ट गुंतवणूक त्यांना मालामाल करत आहे. पाच वर्षांपूर्वी असाच एक आयपीओ आला होता, त्याच्या शेअर्सची तेव्हा किंमत ७५ रुपये होती. या शेअरने अमिताभ यांना साडे तेरा कोटी रुपये मिळवून दिले आहेत. 

२०१७ मध्ये स्मॉलकॅप कंपनी डीपी वायर्स (DP Wires)चा आयपीओ आला होता. बिग बींनी य़ामध्ये पैसे गुंतविले आणि पाच वर्षे हा शेअर्स ठेवला. त्यांनी केलेली ही गुंतवणूक आता त्यांना बंपर रिटर्न देत आहे. कारण या शेअरमध्ये सध्या वेगाने वाढ होऊ लागली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पाच पटींनी वाढले आहेत. 

सप्टेंबरच्या अखेरीस हा शेअर लिस्ट झाला होता. तेव्हापासून अमिताभ यांचा शेअर होल्डिंग 2.45% म्हणजेच 13,41,18,400 एवढी झाली आहे. SME स्टॉक नंतर 17 जानेवारी 2022 रोजी मेनबोर्डवर वळविण्यात आला. डीपी वायर्समध्ये बिग बींच्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य सुमारे 13.4 कोटी रुपये आहे.

सोमवारच्या व्यवहारात NSE वर शेअर 408 रुपये प्रति शेअरच्या आसपास होता. सूचीबद्ध झाल्यापासून शेअरने आश्चर्यकारक 444% परतावा दिला आहे. तर एक वर्षात तो आतापर्यंत 58% पेक्षा जास्त वाढला आहे.

Q2FY23 मध्ये कंपनीचा फायदा हा 51.2% वाढला आहे. कंपनीने गेल्या एक वर्षात 5.97 कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये कंपनीची विक्री 114.77% वाढून 283.96 कोटी रुपये झाली होती. गेल्या वर्षी ती 132.22 कोटी रुपये होती. 

टॅग्स :अमिताभ बच्चनशेअर बाजार