Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमिताभ चौधरी होणार अ‍ॅक्सिस बँकेचे सीईओ

अमिताभ चौधरी होणार अ‍ॅक्सिस बँकेचे सीईओ

अ‍ॅक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपत असून, त्यांची जागी अमिताभ चौधरी घेतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:12 AM2018-09-10T01:12:17+5:302018-09-10T01:12:31+5:30

अ‍ॅक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपत असून, त्यांची जागी अमिताभ चौधरी घेतील.

Amitabh Chaudhary will be the CEO of Axis Bank | अमिताभ चौधरी होणार अ‍ॅक्सिस बँकेचे सीईओ

अमिताभ चौधरी होणार अ‍ॅक्सिस बँकेचे सीईओ

मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपत असून, त्यांची जागी अमिताभ चौधरी घेतील. चौधरी यांची नियुक्ती १ जानेवारी, २०१९ पासून तीन वर्षांसाठी (३१ डिसेंबर, २०२१) असून त्याला रिझर्व्ह बँकेने मंजूरी दिली आहे. शिखा शर्मा यांच्या कारकिर्दीत बँकेने प्रगती केली. तथापि, बँकेच्या कर्जवसुलीची पातळी त्यांच्याच काळात घटली व तो काळजीचा विषय ठरला.
अमिताभ चौधरी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सीईओ आहेत. अ‍ॅक्सिस बँकेने नवे सीईओ नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वारसाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीने जागतिक सल्लागार कंपनीची नियुक्ती उमेदवारांचे मूल्यमापन करण्यासाठी केली. नऊ एप्रिल रोजी अ‍ॅक्सिस बँकेने शिखा शर्मा यांची छोट्याशा कालावधीसाठी फेरनियुक्तीची विनंती नियामकांच्या मान्यतेच्या अटीवर मान्य केली.

Web Title: Amitabh Chaudhary will be the CEO of Axis Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.