आज अमिताताई चव्हाण दाखल करणार अर्ज
By admin | Published: September 25, 2014 11:04 PM
भोकर: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमिताताई चव्हाण आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असून यानंतर मोंढा मैदानात जाहीर सभा होणार आहे.
भोकर: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमिताताई चव्हाण आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असून यानंतर मोंढा मैदानात जाहीर सभा होणार आहे.भोकर विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या पाठिमागे पूर्वीपासूनच खंबीरपणे उभा ठाकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मोठा विजय मिळविला. आता यावेळी चव्हाण यांच्या सौभाग्यवती अमिताताई चव्हाण या २६ सप्टेंबर रोजी काँग्रेसकडून आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत. सदरील नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर मोंढा मैदानात जाहीर सभा होणार आहे. यावेळी खा. अशोकराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, संतोष पांडागळे यांची उपस्थिती राहणार आहे. (वार्ताहर)