लोकमत न्यूज नेटवर्कन्यूयॉर्क : फोर्बेस नियतकालिकाने जारी केलेल्या जगातील १00 सर्वोत्तम व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्सच्या यादीत ११ भारतीय गुंतवणूकदारांचा समावेश आहे. व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स हे स्टार्टअप किंवा छोट्या कंपन्यांना भांडवल पुरवितात अथवा भांडवल उभारण्यास मदत करतात.‘मिडास २0१७’ या नावाने ही यादी प्रसिद्ध झाली आहे. २00 दशलक्ष डॉलरचा आयपीओ अथवा अधिग्रहण किंवा ४00 दशलक्ष डॉलरचे खाजगी धारण या माध्यमातून पैसे उभे करणाऱ्यांचा तसेच केलेल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळविणाऱ्यांचा या यादीत समावेश आहे. सेक्वेईया कॅपिटलचे भागिदार जीम गोयेट्झ या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी व्हॉटसअॅपची फेसबुकला २२ अब्ज डॉलरला विक्री केली होती. यादीतील ११ व्हेंचर कॅपिटॅलिस्ट भारतीय आहेत. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोच्च परतावा मिळवून देण्यात त्यांचा वाटा आहे. या ११ जणांत नीरज अग्रवाल हे भारतीयांत सर्वोच्च स्थानी आहेत. यादीतील त्यांचा क्रमांक १७ वा आहे. बॅटरी व्हेंटर्समध्ये ते सामान्य भागिदार आहे. अन्य भारतीयांत समीर गांधी (स्थान-२३), अशीम चंदन (२८), सलील देशपांडे (३३), अनील भुसारी (३७), गौरव गर्ग (४८), प्रमोद हक (६७), हेमंत तनेजा (७0), नवीन चढ्ढा (७३), रवी म्हात्रे (७६), देवेन पारेख (९९) यांचा समावेश आहे. मिडास यादीत स्थान मिळविण्याची अग्रवाल यांची ही सलग सातवी वेळ आहे.
सर्वोत्तम गुंतवणूकदारांत ११ भारतीय
By admin | Published: May 16, 2017 1:56 AM