Join us

जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:17 AM

Top 10 Companies In World : आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३.५३५ ट्रिलियन डॉलर झालंय.

Top 10 Companies In World : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांत जवळपास १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे ती जगातील टॉप ५० कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. companiesmarketcap.com नं दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जगातील टॉप कंपन्यांच्या यादीत 57 व्या क्रमांकावर घसरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप सुमारे २२०.०५ अब्ज डॉलर आहे. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ०.१७ टक्क्यांच्या २७१७ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३,२१७.९० रुपये आहे.

आयफोन (iPhone) बनवणारी अमेरिकन कंपनी अॅपल (Apple) मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३.५३५ ट्रिलियन डॉलर झालंय. पण कंपनीच्या स्थानाला एनव्हीडियाकडून धोका आहे. एआय चिप उत्पादक एनव्हिडियाचं मार्केट कॅप ३.३८८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. मायक्रोसॉफ्ट ३.१०१ डॉलर मार्केट कॅपसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट १.९८७ ट्रिलियन डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन १.९७४ ट्रिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे टॉप ५ मधील सर्व कंपन्या अमेरिकेतील आहेत.

टॉप १०० मध्ये कोण?

सौदी अरामको १.७३८ ट्रिलियन डॉलरच्या मार्केट कॅपसह सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या १०० मध्ये केवळ दोन भारतीय कंपन्या आहेत. टाटा समूहाची कंपनी टीसीएस १७८.३६ अब्ज डॉलरमार्केट कॅपसह ८० व्या स्थानावर आहे. त्यात चीनच्या १० कंपन्यांना स्थान मिळालं आहे. या यादीत अमेरिकन कंपन्यांचं वर्चस्व आहे. टॉप १०० मध्ये अमेरिकेच्या जवळपास दोन तृतीयांश कंपन्या आहेत. कमाईच्या बाबतीत सौदी अरामको पहिल्या क्रमांकावर आहे, तर वॉलमार्ट महसूल आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार पहिल्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :रिलायन्सअॅपल