Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार आॅनलाईन रक्कम

प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार आॅनलाईन रक्कम

नोकरी बदलल्यावर अथवा एखाद्या आपद्प्रसंगी प्रॉव्हिडंट फंडाच्या संचितामधून जर पैसे काढण्याची वेळ आली तर ती प्रक्रिया येत्या मार्चअखेरीपासून अधिक सुलभ होणार आहे

By admin | Published: November 14, 2015 01:33 AM2015-11-14T01:33:19+5:302015-11-14T01:33:19+5:30

नोकरी बदलल्यावर अथवा एखाद्या आपद्प्रसंगी प्रॉव्हिडंट फंडाच्या संचितामधून जर पैसे काढण्याची वेळ आली तर ती प्रक्रिया येत्या मार्चअखेरीपासून अधिक सुलभ होणार आहे

The amount of online withdrawal from provident fund | प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार आॅनलाईन रक्कम

प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार आॅनलाईन रक्कम

मुंबई : नोकरी बदलल्यावर अथवा एखाद्या आपद्प्रसंगी प्रॉव्हिडंट फंडाच्या संचितामधून जर पैसे काढण्याची वेळ आली तर ती प्रक्रिया येत्या मार्चअखेरीपासून अधिक सुलभ होणार आहे. ही सुविधा लवकरच आॅनलाईन उपलब्ध होणार असून यामुळे पैसे काढण्यासाठी आॅनलाईन केल्यापासून अवघ्या ४८ तासांत हे पैसे सदस्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सदस्यांना ही सुविधा देण्यासाठी विभागातर्फे आपल्या वेबसाईटवर मार्च अखेरीपर्यंत याचा पर्याय खुला करून देण्यात येईल. ही सुविधा देण्याकरिता युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देतेवेळी जो बँक खाते क्रमांक देण्यात आला होती, त्याद्वारे जोडणी करण्यात आली आहे. यामुळे सदस्य ज्यावेळी आॅनलाईन विड्रॉवर सुविधेचा वापर करेल, त्यानंतर ४८ तासांत त्याच्या खात्यामध्ये त्याचे पैसे जमा होतील. पैसे काढण्याची आॅनलाईन सेवा ही डिसेंबर अखेरीपर्यंत सुरू करण्याचा मानस होता. मात्र, जवळपास सहा लाख सदस्यांची आधार कार्ड तसेच आयएफएससी कोड आणि इतर तपशील जुळत नसल्यामुळे हा प्रकल्प थोडा रखडला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The amount of online withdrawal from provident fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.