Join us

प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार आॅनलाईन रक्कम

By admin | Published: November 14, 2015 1:33 AM

नोकरी बदलल्यावर अथवा एखाद्या आपद्प्रसंगी प्रॉव्हिडंट फंडाच्या संचितामधून जर पैसे काढण्याची वेळ आली तर ती प्रक्रिया येत्या मार्चअखेरीपासून अधिक सुलभ होणार आहे

मुंबई : नोकरी बदलल्यावर अथवा एखाद्या आपद्प्रसंगी प्रॉव्हिडंट फंडाच्या संचितामधून जर पैसे काढण्याची वेळ आली तर ती प्रक्रिया येत्या मार्चअखेरीपासून अधिक सुलभ होणार आहे. ही सुविधा लवकरच आॅनलाईन उपलब्ध होणार असून यामुळे पैसे काढण्यासाठी आॅनलाईन केल्यापासून अवघ्या ४८ तासांत हे पैसे सदस्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.उपलब्ध माहितीनुसार, सदस्यांना ही सुविधा देण्यासाठी विभागातर्फे आपल्या वेबसाईटवर मार्च अखेरीपर्यंत याचा पर्याय खुला करून देण्यात येईल. ही सुविधा देण्याकरिता युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देतेवेळी जो बँक खाते क्रमांक देण्यात आला होती, त्याद्वारे जोडणी करण्यात आली आहे. यामुळे सदस्य ज्यावेळी आॅनलाईन विड्रॉवर सुविधेचा वापर करेल, त्यानंतर ४८ तासांत त्याच्या खात्यामध्ये त्याचे पैसे जमा होतील. पैसे काढण्याची आॅनलाईन सेवा ही डिसेंबर अखेरीपर्यंत सुरू करण्याचा मानस होता. मात्र, जवळपास सहा लाख सदस्यांची आधार कार्ड तसेच आयएफएससी कोड आणि इतर तपशील जुळत नसल्यामुळे हा प्रकल्प थोडा रखडला आहे. (प्रतिनिधी)