Join us

‘अमरावती’त १.७८ लाख टन उस गाळप

By admin | Published: January 29, 2016 3:44 AM

पश्चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका बसला असून, राज्यात झालेल्या ४४३.०४ लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनापैकी केवळ १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन

- ब्रह्मानंद जाधव, मेहकर (बुलडाणा)पश्चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका बसला असून, राज्यात झालेल्या ४४३.०४ लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनापैकी केवळ १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन अमरावती विभागात झाले आहे. राज्यात ४१५.९७ लाख टन तर अमरावती विभागात १.७८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पश्चिम विदर्भात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत घटले आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा फटका ऊस उत्पादकांना बसला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उस उत्पादन घटले असून, सध्या १७३ साखर कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये ९६ सहकारी व ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात यंदा ४१५.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याच्या एकूण ऊस गाळपापैकी सर्वात कमी२ ऊस गाळप अमरावती विभागात झाले आहे. अमरावती विभागामध्ये केवळ १.७८ लाख टन उसाचे गाळप व १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात २.९० लाख टन उसाचे गाळप व २.७४ लाख क्विंटल उत्पादन झाले आहे.