गणेश वासनिक / अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘स्टार्ट अप इंडिया’च्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच रोजगार निर्मितीची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी बांबू आणि ज्यूटच्या वस्तूंचे उत्पादन करून रोजगार निर्मितीचा प्रयोग विद्यापीठाने यशस्वी केला आहे. ‘शिका, बनवा, विका’ ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल आणणार असल्याचा विश्वास कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’ची हाक दिली. त्याला विद्यापीठाने समयोचित प्रतिसाद दिला. विद्यापीठांतर्गत यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांतील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना बांबूपासून राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील काही राख्या विद्यार्थ्यांनी राज्यपालांना भेट म्हणून पाठविल्या होत्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या प्रयोगाची प्रशंसा केली.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर, मेळघाटातील लवादा येथील बांबू प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख सुुनील देशपांडे यांनी बांबूपासून वस्तू निर्मितीला मोठा वाव असल्याची पुष्टी राजभवनला दिली आहे.
पाच एकरांत बांबू लागवड
विद्यापीठाने बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या बांबूचा वापर करण्यात येईल. देशभरातील बांबूच्या विविध प्रजातींचे संगोपन करण्यासाठी पाच एकरात बांबू लागवड केली जाईल.
दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण
राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) मुलींना बांबूपासून लेडीज पर्स, वॉलेट, मोबाइल पर्स, कापडी पिशव्या, बॅग आदी साहित्य तयार करण्याचे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक गणेश मालटे यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या मनात बांबूविषयी आस्था निर्माण व्हावी, हा देखील प्रशिक्षणाचा उद्देश आहे. राज्यपालांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आम्हाला बळ देणारे ठरले आहे. बांबूपासून तयार होणाऱ्या साहित्याला व्यापक बाजारपेठ असल्याने हा उपक्रम ‘स्टार्ट अप इंडिया’साठी पूरक ठरेल.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
अमरावती विद्यापीठाचे ‘स्टार्ट अप इंडिया’च्या दिशेने पाऊल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘स्टार्ट अप इंडिया’च्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच रोजगार निर्मितीची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी बांबू आणि ज्यूटच्या वस्तूंचे
By admin | Published: October 6, 2016 06:06 AM2016-10-06T06:06:07+5:302016-10-06T06:06:07+5:30