Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमूल .. २ ...

अमूल .. २ ...

जागतिक मंदीचा परिणाम

By admin | Published: April 24, 2015 12:55 AM2015-04-24T00:55:14+5:302015-04-24T00:55:14+5:30

जागतिक मंदीचा परिणाम

Amul .. 2 ... | अमूल .. २ ...

अमूल .. २ ...

गतिक मंदीचा परिणाम
जागतिक डेअरी व्यवसायावर मत मांडताना सोधी म्हणाले, सध्याचा डेअरी उद्योग जागतिक मंदीतून जात असून, अनेक देशांंनी आपली डेअरी उत्पादने बाजारात आणली आहेत. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर डेअरी उत्पादनाच्या निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे जगात दुधाच्या किमतीत ५० टक्के घट झाली आहे. चीन हा डेअरी उत्पादनांचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. पण या देशाने आयात बंद केली आहे. त्याचाही परिणाम डेअरी उत्पादनाच्या किमतीवर पडला आहे. मलाईरहित दूध पावडरचे प्रति टन दर ४,५०० डॉलरवरून २,००० डॉलरपर्यंत खाली आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारतात दुधाचे दर ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या यातून बाहेर निघण्याची शक्यता नसल्याने भारतीय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक मंदीतून दूर ठेवण्याची गरज आहे. अमूल तेच करीत असून, डेअरी उत्पादनावर भर देत असल्याचे सोधी म्हणाले.
अमूलचे महाराष्ट्रावर लक्ष्य
महाराष्ट्रात छोट्या डेअरी सहकारी संस्था स्थापनेचा अमूलचा प्रयत्न असून, सध्या दरदिवशी ७ ते ८ लाख लिटर दूध गोळा करण्यात येते. विदर्भाचा विचार केल्यास उमरखेड येथील डेअरी सहकारी संस्थेकडून दरदिवशी २० हजार लिटर आणि भंडारा जिल्ह्यातून ३५ हजार लिटर दुधाचे संग्रहण करण्यात येते. वसुंधरा डेअरीच्या सहकार्याने हिंगणी एमआयडीसी येथे दूध प्रक्रिया प्रकल्प स्थापना केला आहे. या प्रकल्पात पाऊच दूध, मलाईदार दूध, आईस्क्रीम आणि दह्याचे उत्पादन करण्यात येते. प्रकल्पाची क्षमता वाढवून दरदिवशी एक लाख लिटर आईस्क्रीम तयार करण्याचे लक्ष्य आहे. नवीन उत्पादनासंदर्भात सोधी म्हणाले, कंपनीने बेल्जियम चॉकलेटपासून ईिपक नावाने आईस्क्रीम कॅन्डी, शिवाय अन्य उत्पादन मॅग्नम बाजारात आणले आहे. ईिपकची किंमत ४० रुपये तर मॅग्नमची किंमत ८० रुपये आहे.

Web Title: Amul .. 2 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.