नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी अमुल दुधाने ग्राहकांना झटका दिला आहे. अमुलने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ फक्त गुजरात राज्यासाठी असल्याचे अमुलने म्हटले आहे. अमूल ताझा, शक्ती, टी स्पेशल, गायीचे दूध, चा माझा, स्लिम अँड स्ट्रीम, ए ते गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रँडच्या किमतीत आता २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
या नवीन किमती आजपासून लागू होणार आहेत. नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड ६४ रुपये, अमूल शक्ती ५८ रुपये आणि अमूल फ्रेश ५२ रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ते आता ३४ रुपये प्रति ५०० मिली दराने विकले जाईल.
माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगींच्या पत्नीनं दिल्लीत पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत १६० कोटी
अमूल ब्रँडच्या किमती सहा महिन्यांत दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. गुजरातपूर्वी संपूर्ण देशात दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत. दुसरीकडे, अमूल डेअरीने पशुपालकांना २० रुपये प्रति किलो फॅट या दराने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आता पशुपालकांना प्रतिकिलो फॅटचे पेमेंट ८०० रुपयांवरून ८२० रुपये करण्यात येणार आहे. तसेच दूध भरणाऱ्या सभासदांना अपघात विमा देण्याची घोषणा केली आहे.