Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amul milk price hike : अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ; जाणून घ्या...

Amul milk price hike : अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ; जाणून घ्या...

Amul milk price hike : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)  एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:32 PM2022-02-28T17:32:04+5:302022-02-28T17:35:39+5:30

Amul milk price hike : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)  एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे.

Amul Milk Price Hike By 2 RS Per Liter From 1 March 2022 | Amul milk price hike : अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ; जाणून घ्या...

Amul milk price hike : अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ; जाणून घ्या...

गांधीनगर : आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दरांनुसार, आता मंगळवार, 1 मार्चपासून अहमदाबाद आणि सौराष्ट्र (गुजरात) बाजारपेठेत अमूल गोल्ड दुधासाठी 30 रुपये प्रति 500 ​​मिलीलीटर, अमूल ताजा 24 रुपये प्रति 500 ​​मिलीलीटर आणि अमूल शक्ती दुधासाठी 27 रुपये 500 ​​मिली लिटर मोजावे लागतील. 

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)  एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ सोना, ताजा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या कालावधीनंतर दरात वाढ करण्यात येत आहे. 

दरम्यान, उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अमूलने गेल्या 2 वर्षांत आपल्या ताज्या दुधाच्या श्रेणीतील दरात केवळ 4 टक्के वाढ केली आहे. पॅकेजिंग, लॉजिस्टिक, पशुखाद्याचा खर्च वाढल्यामुळे ही किंमत वाढली आहे, त्यामुळे दूध संचालन आणि उत्पादनाचा एकूण खर्च वाढला आहे.

अमूलचे देशभराच अनेक प्लांट्स
अमूलचे देशभरात अनेक प्लांट्स आहेत. त्यापैकी 13 प्लान्ट्स केवळ गुजरातमध्ये आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआरमध्ये 4 प्लांट्स, उत्तर प्रदेशात 2, महाराष्ट्रात 4, राजस्थानमध्ये 3 प्लांट्स आहेत. याशिवाय छत्तीसगड, आसाम, मध्य प्रदेश, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही प्लांट आहे. 

Web Title: Amul Milk Price Hike By 2 RS Per Liter From 1 March 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.