नवी दिल्ली : अमूल कंपनी येत्या पाच महिन्यांत दुधाचा भाव वाढविणार नाही; परंतु पावसाळ्याच्या प्रारंभी त्याविषयी आढावा घेतला जाईल, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
२०१४ च्या मे महिन्यात दुधाच्या भावात वाढ झाली होती. सध्या जास्तीचे उत्पादन आणि खरेदीमुळे येत्या चार महिन्यांत दुधाच्या भावात वाढ करण्याचा आमचा विचार नाही, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी सांगितले. आज चाऱ्याचे भाव स्थिर असून कमी ऊर्जा आणि वाहतुकीचा खर्च विचारात घेता दूध उत्पादनावरील खर्च नियंत्रणात आहे, असे सोढी म्हणाले. पाच महिन्यांनंतर आम्ही भाव वाढविण्यावर विचार करू. कारण भाववाढीचा संबंध चाऱ्याच्या भावाशी असतो. आम्ही जेव्हा दर वाढविला तो लिटरमागे केवळ २ रुपयेच होता, असे ते म्हणाले.
दूध उत्पादन आणि खरेदीत वाढ झाल्याचे कारण सांगताना सोढी म्हणाले की, गुजरात आणि देशाच्या अन्य भागातून खरेदी वाढली असून ती रोजची १९५ लाख लिटरपर्यंत गेली आहे. त्याआधी ती सरासरी १५५ लाख लिटर होती. खासगी डेअरींकडून मिळणारा भाव हा अमूलकडून मिळणाऱ्या भावापेक्षा कमी असतो. त्यामुळे आमची खरेदी वाढली असल्याचे सोढी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आगामी पाच महिने अमूल दुधाचे भाव वाढविणार नाही
अमूल कंपनी येत्या पाच महिन्यांत दुधाचा भाव वाढविणार नाही; परंतु पावसाळ्याच्या प्रारंभी त्याविषयी आढावा घेतला जाईल, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.
By admin | Published: February 10, 2015 11:13 PM2015-02-10T23:13:43+5:302015-02-10T23:13:43+5:30