सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं. आता एका कर्मचाऱ्याचे रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. नोकरी सोडण्यासाठी जे कारण त्या व्यक्तीनं दिलंय त्यामुळेच हे रेजिग्नेशन लेटर व्हायरल होत आहे. इंजिनीअरहबचे सहसंस्थापक रिषभ सिंग यांनी हे रेजिग्नेशन लेटर आपल्या एक्सवर अकाऊंटवरून पोस्ट केलंय. या रेजिग्नेशन लेटरमध्ये असलेलं कारण पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल.
एका कर्मचाऱ्याचं रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमी पगारामुळे आपल्याला फोन खरेदी करता येत नाहीये. अशा परिस्थितीत आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं नसल्याचं त्यानं म्हटलंय.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय लिहिलंय इमेलमध्ये?
'दोन वर्षांच्या मेहनतीनंतर माझी सॅलरी माझ्या इनक्रिमेंट मिळवण्याच्या इच्छेप्रमाणेच गोठली आहे असं वाटतंय. ५ डिसेंबर रोजी मला iQOO 13 बूक करायचा होता, ज्याची किंमत ५१,९९९ रुपये होती. परंतु माझ्या सॅलरीमुळे मला तो विकत घेणं शक्य झालं नाही. माझ्याकडे भारतातील सर्वात अॅडव्हान्स्ड फोन घेण्यासाठी पैसे नाहीत, तर माझं करिअर कसं पुढे जाईल याची चिंता आहे,' असं त्यानं मेलमध्ये लिहिलंय.
One of the finest reason for Resignation 😃 pic.twitter.com/0Gwtpcxxje
— Rishabh Singh (@merishabh_singh) January 7, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या रेजिग्नेशन लेटरबद्दल युजर्स मोठ्या चर्चा करत आहेत. काही लोक याला फेक म्हणत आहेत, तर काही लोक हा फोन कंपनीचा मार्केटिंग ई-मेल असल्याचं म्हणत आहेत.