100 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय वारसा असलेल्या, इंटिरियर सोल्यूशन्स सेगमेंट मधील जागतिक आघाडीवर असलेल्या हॅफलेने आपल्या भारतीय उपकंपनीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. ही भागीदारी म्हणजे अचूकता, गुणवत्ता आणि मूल्यांप्रति कटिबद्धतेचा वारसा असलेल्या या दोघांचे एकत्र येणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि दोन दशकाहून अधिक कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी जगभरात 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळख असणारे, तेंडुलकर हे उत्कृष्टता, निष्ठा आणिdiwas अथक प्रयत्नांच्या परिपूर्णतेचे प्रतीक आहेत - हीच मूल्ये हॅफले शी समरस होणारी आहेत.
ब्रँडचे उद्दिष्ट मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी,मुल्य वाढण्यासाठी आणि हॅफलेच्या अत्याधुनिक इंटिरियर सोल्युशन्ससह ग्राहकांना त्यांच्या जागा अधिक सुशोभित करण्यास प्रेरित करण्यासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकर हॅफले बरोबर सहकार्य करतील.
हॅफलेच्या दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक फ्रँक श्लोडर म्हणाले की,सचिन तेंडुलकर यांची पाककलेप्रती असलेली आवड लक्षात घेता आमच्या ब्रँडसाठी ते अगदी योग्य आहेत असा आम्हाला विश्वास आहे.आमच्या समकालीन इंटिरियर सोल्युशन्सना ग्राहकांसमोर आणण्यासाठी तसेच कार्यक्षमता,आधुनिक तंत्रज्ञान आणि वर्धित सौंदर्यशास्त्र अधोरेखित करण्यासाठी ते सुयोग्य आहेत. याशिवाय त्यांची चिकाटी आणि तपशीलाकडे बारकाईने लक्ष देणे हे आमच्या ब्रँडच्या मुल्यांशी पूर्णपणे जुळते. सचिनबरोबर जोडले जात असताना प्रेरणा आणि अभिनवतेचा प्रवास सुरू करण्यास आणि लोकांना मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस ची जाणिव करून देण्यास आणि त्या सुधारण्याच्या पध्दतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
आपला उत्साह व्यक्त करताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, हॅफलेसोबत भागीदारी करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मला पाककलेची आवड आहे आणि एक चांगले स्वयंपाक घर हे प्रत्येक कुटुंबाला आनंद देत असते.तरूण भारतीय त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होण्याची आकांक्षा बाळगून,नाविन्यपूर्ण आणि आधुनिक उपाय शोधत असतात.हॅफलेच्या डिझाईन सेंटरला भेट देताना मला हे वास्तविक पाहायला मिळाले. मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाने मला आकर्षित केले आहे आणि एसआरटी स्पोर्टस् मॅनेजमेंट (एसआरटीएसएम) आणि हॅफलेमधील टीम्सना शुभेच्छा देतो. आम्ही आमच्या उद्दिष्टांसाठी सहकार्याने काम करत राहू.
हॅफले आणि सचिन तेंडुलकर यांच्या भागीदारीमुळे एका अतुलनीय प्रवासाची सुरूवात झाली आहे. एकत्रितपणे आम्ही आमच्या ग्राहकांना केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारी घरे तयार करण्यास प्रोत्साहित करत नाही तर,त्यांचे दैनंदिन जीवनमानही उंचावेल यासाठी प्रेरित करण्यास उत्सुक आहोत.
हॅफले इंडिया ही हॅफले ग्लोबल नेटवर्कची संपूर्ण उपकंपनी असून 2003 पासून भारतात आपले कामकाज करत आहे. वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठ समजून घेण्याच्या क्षमतेमुळे कंपनीने आर्किटेक्चरल हार्डवेअर,फर्निचर आणि किचन फिटिंग्ज व अॅक्सेसरीज या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.गृहउपयोगी वस्तू,इंटिरियर लायटिंग,वॉटर सोल्युशन्स व सरफेसेस या उद्योगकेंद्रित, समक्रमित उत्पादन श्रेणीमध्येही कंपनीची मजबूत उपस्थिती आहे.
या उपकंपनीचे मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोचीन, दिल्ली, जयपूर, चंदीगड आणि कोलकाता येथे कार्यालयांसह आपली भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक कार्यालये आणि डिझाईन शोरूमसह कंपनी पूर्णपणे कार्यरत आहे. त्याशिवाय कंपनीने नेपाळ,भूतान व मालदीवसह दक्षिण आशियामध्ये देखील विस्तार केला आहे.
हॅफले डिझाईन शोरूम्स हे आंतरराष्ट्रीय होम इंटिरियरचे क्रेंद आहेत आणि जागतिक दर्जाच्या वातावरणात येथे सादर केेलेले अत्याधुनिक डिझाईन्स आहेत. येथे ग्राहक होम सोल्युशनसाठीचे उपाय बघू शकतात.या शोरूम्स घरातील सर्व इंटिरियर्स व सुधारणा संबंधित ग्राहकांच्या गरजांसाठी वन स्टॉप शॉप म्हणून काम करतात.या शोरूम्समध्ये असलेल्या तज्ञांच्या टीमद्वारे स्वयंपाक घर आणि वॉर्डरोब डिझाईनिंग सेवांसाठी सखोल तांत्रिक सल्ला प्रदान केला जातो.
हॅफले इंडिया हे आपल्या 1500 कर्मचारी वर्गासह तसेच 180 हून अधिक दुकानांच्या एक भक्कम फ्रँचायझी व्यवस्थेसह व 500 हून अधिक थेट डीलर्स,90 हून अधिक वितरकांसह आपल्या ग्राहकांना सेवा प्रदान करते. हे भक्कम जाळे पुढे 10,000 हून अधिक सॅटेलाईट डीलर्सना सेवा देतात. या उपकंपनीचे मुंबईत अत्याधुनिक लाजिस्टिक केंद्र असून दिल्ली,बंगळुरू,कोलकाता आणि कोलंबो येथे वितरण केंद्रे आहेत.
मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस टुगेदर
हॅफलेचा इतिहास म्हणजे फर्निचरपासून ते दारापासून खोलीपर्यंत सातत्यपूर्ण सेवांची कथा आहे. आमचा मार्ग हा कार्यक्षमतेपासून ते संपर्क आणि वातावरण,शाश्वत ग्राहक प्रक्रियेकडे तसेच उत्पादन विकासापासून विक्रीपश्चात सेवांपर्यंत घेऊन जाणारा आहे. याशिवाय गतीमान उद्योजकता,ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची आमची बांधिलकी ही अॅडॉल्फ हॅफलेने स्थापित केलेल्या कंपनीचा आवश्यक भाग आहे आणि तेच आम्हाला भविष्यात आणखी बळकट करायचे आहे. 'मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस.टुगेदर' हे हॅफले ब्रँडचे उद्दिष्ट असून एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करते,जे ग्राहकांसाठी सर्वांगीण आणि शाश्वत वातावरण प्रदान करून राहण्याच्या आणि कामाच्या जागेच्या बहुगुणी फायद्याचा आनंद घेण्यास मदत करत आहे.