Lokmat Money > बिझनेस न्यूज > Youtube च्या एका आयडियानं मजुराचं आयुष्य बदललं; आज कमावतो लाखोंची कमाई

Youtube च्या एका आयडियानं मजुराचं आयुष्य बदललं; आज कमावतो लाखोंची कमाई

उमेशने अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केले मात्र त्याला कुठूनही मदत मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:29 PM2023-12-22T12:29:52+5:302023-12-22T12:31:06+5:30

उमेशने अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केले मात्र त्याला कुठूनही मदत मिळाली नाही

An idea from YouTube changed the life of a laborer Umesh Dubey; Earning millions today | Youtube च्या एका आयडियानं मजुराचं आयुष्य बदललं; आज कमावतो लाखोंची कमाई

Youtube च्या एका आयडियानं मजुराचं आयुष्य बदललं; आज कमावतो लाखोंची कमाई

 एखाद्यानं आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि मनात निश्चयगाठ बांधली तर त्याला अपयशातून यशाचा मार्ग शोधणे कठीण नाही असं म्हटलं जाते. फक्त तुमचा संकल्प मजबूत असावा. असेच उदाहरण बस्ती इथं पाहायला मिळाले. जिल्ह्यातील रुधौली तहसील भागातील महुवारी गावातील रहिवासी उमेश दुबे, जो पानिपतमध्ये राहत असताना मजूर म्हणून काम करत होता. त्याच दरम्यान लॉकडाऊन लागू झाला आणि त्याची नोकरी गेली.यामुळे निराश होऊन तो घरी आला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याचा विचार करू लागला. 

मग एके दिवशी त्याने यूट्यूबवरून कोंबडी आणि बदक पालनाचा व्हिडिओ पाहिला, मग काय, त्याने त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधत पैशांची व्यवस्था केली.त्यानंतर कोंबडी आणि बदक पाळण्यास सुरुवात केली आणि आज तो फक्त इतर दोन लोकांना रोजगार देत नाही तर स्वत:ही आत्मनिर्भर झाला आहे.यूट्यूबवरून कोंबडी आणि बदक पालन कसं करायचे हे शिकल्यानंतर उमेशकडे आज ५०० कडकनाथ, ३०० देशी आणि ४०० सामान्य कोंबड्या आहेत. याशिवाय त्याच्याकडे २०० बदकेही आहेत. आज तो मुलांना अंडी विकून दरमहा ३०-३५ हजार रुपये कमवत आहेत. यासोबतच उमेश स्वत:सह अन्य दोन जणांनाही रोजगार देत आहे. अशाप्रकारे आपत्तीत संधी शोधून उमेश वर्षाला ५ ते ६ लाख रुपये कमवत आहे त्याचसोबत इतरांना प्रेरणा देत आहे.

उमेश दुबे याने सांगितले की,मी यूट्यूबच्या माध्यमातून कोंबडी आणि बदक पाळण्याची कला शिकली. त्यानंतर हरियाणातून कडकनाथ आणि एमपीच्या झाबुआ, स्थानिक कोंबडीची पिल्ले मागवली. त्यांचे संगोपन सुरू केले. आज माझ्या शेतात ग्राहक येतात आणि स्थानिक कोंबडीची अंडी २५-३० रुपयांना आणि बदकाची अंडी १५-२० रुपयांना विकली जातात. त्यामुळे चांगला नफा मिळतो.मी अगदी स्थानिक पद्धतीने शेती करतो आणि आपल्या कोंबड्यांना आणि बदकांना शुद्ध घरगुती अन्न देतो. त्यांना नेहमी खुले ठेवतो असं त्याने म्हटलं. 

दरम्यान, उमेशने अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केले मात्र त्याला कुठूनही मदत मिळाली नाही. प्रत्येक ठिकाणी त्याच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर लोकांकडून पैसे उसने घेऊन चार लाख रुपये खर्चून कोंबडी आणि बदक पालन सुरू केले. मात्र, आजपर्यंत उमेशला या कामासाठी कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ मिळालेला नाही.

Web Title: An idea from YouTube changed the life of a laborer Umesh Dubey; Earning millions today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.