Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयआयटीच्या विद्यार्थ्याला मिळाले ४ कोटी रुपयांचे पॅकेज, ३३ जणांना १ कोटीपेक्षा अधिकचे पॅकेज

आयआयटीच्या विद्यार्थ्याला मिळाले ४ कोटी रुपयांचे पॅकेज, ३३ जणांना १ कोटीपेक्षा अधिकचे पॅकेज

यंदाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ३५ पेक्षा अधिक स्टार्टअप आणि २५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:52 AM2022-12-22T09:52:24+5:302022-12-22T09:52:48+5:30

यंदाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ३५ पेक्षा अधिक स्टार्टअप आणि २५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या.

An IIT student got a package of Rs 4 crore 33 people got a package of more than Rs 1 crore | आयआयटीच्या विद्यार्थ्याला मिळाले ४ कोटी रुपयांचे पॅकेज, ३३ जणांना १ कोटीपेक्षा अधिकचे पॅकेज

आयआयटीच्या विद्यार्थ्याला मिळाले ४ कोटी रुपयांचे पॅकेज, ३३ जणांना १ कोटीपेक्षा अधिकचे पॅकेज

नवी दिल्ली : आयआयटी कानपूरच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये एका विद्यार्थ्यास एका बहुराष्ट्रीय कंपनीने तब्बल चार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्याच्यासह ३३ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे पॅकेज मिळाले आहे. तसेच ७४ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकऱ्या मिळाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५७ टक्के अधिक आहे.

आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले की, यंदाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ३५ पेक्षा अधिक स्टार्टअप आणि २५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या. त्यांनी १,२०० नोकऱ्यांचे प्रस्ताव आणले होते. १,१२८ विद्यार्थ्यांना त्यांनी नोकऱ्यांसाठी निवडले आहे. 

आयआयटी कानपूरच्या एका विद्यार्थ्यास विदेशात चार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. याआधीच्या २.५ कोटी रुपयांच्या पॅकेजचा विक्रम यंदा त्याने तोडला. एका विद्यार्थ्यास १.९ कोटी रुपयांचे देशांतर्गत पॅकेज मिळाले आहे.

या आहेत नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या
रकुटेन मोबाइल, अमेरिकन एक्स्प्रेस, इंटेल, मायक्रोसॉफ्ट इंडिया, क्वालकॉम, ओरॅकल इंडिया प्रा. लिमिटेड, सॅप लॅब्स, कॅप्टल वन, रिलायन्स, ॲक्सिस बँक, जग्वार लँड रोवर इंडिया, जिओ, वॉलमार्ट, आयसीआयसीआय लोम्बार्ड, एअरबस ग्रुप इंडिया 

बँकिंग क्षेत्रात
कॅपिटल वन, क्वाडये सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन चेस, पीडब्ल्यूसी, एचएसबीसी, वेल्स फारगो, आयसीआयसीआय लोम्बार्ड जीआयसी लिमिटेड

टेक कंपन्या
रकुटेन मोबाइल, इंटेल, मायक्रोसॉफ्ट इंडिया, क्वालकॉम, ईएक्सएल, ओरॅकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एसएपी लॅब्स, वॉलमार्ट ग्लोबल टेक इंडिया, लेगाटो हेल्थ टेक्नॉलॉजी.

Web Title: An IIT student got a package of Rs 4 crore 33 people got a package of more than Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी