Join us

How to become crorepati: महिन्याला केवळ ₹४५०० ची गुंतवणूक, मिळतील ₹१,०७,२६,९२१; एक ट्रिक आणि चमकेल नशीब 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:16 AM

तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करायची असेल, तर तुम्ही याद्वारे गुंतवणूक करुन मोठा फंड तयार करू शकता. पाहा कुठे आणि कशी करता येईल गुंतवणूक.

How to become crorepati: तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करायची असेल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP- Systematic Investment Plan) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला एसआयपीद्वारे अधिक परतावा मिळवायचा असेल तर त्यानं दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलंय. एसआयपी कंपाउंडिंगचा लाभ घेण्यासाठी तज्ज्ञांनी १५ ते २० वर्षे गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

दरम्यान, एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. जेणेकरून गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळू शकेल. जर एखाद्या गुंतवणूकदारानं १५ ते २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर शेवट शेवट रक्कम वाढण्याचा दर अधिक असतो आणि यामुळे गुंतवणूकदाराला मोठा परतावा मिळू शकतो.

दीर्घ कालावधीत मोठे रिटर्नतज्ज्ञांच्या मते, जर ही गुंतवणूक २० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी केली असेल, तर त्यावर सरासरी १५ टक्के परतावा अपेक्षित आहे. परंतु, हे गुंतवणूकदारानं कोणत्या प्रकारची एसआयपी निवडली आहे त्यावर अवलंबून असते. योग्य वेळी योग्य एसआयपी निवडल्यास १५ टक्के परतावा सहज मिळू शकतो.

लाखाला कोटींमध्ये बदलण्याची ट्रिकसमजा तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये ४,५०० रुपये गुंतवले आणि त्यावर १५ टक्के रिटर्न अपेक्षित असतील तर तुम्ही ही गुंतवणूक २० वर्षांसाठी केली पाहिजे. एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं तुम्हाला मिळणाऱ्या एकूण रिटर्नबद्दल सांगायचं झालं तर, २० वर्षांच्या अखेरीस तुम्ही ६८,२१,७९७.३९ रुपयांचे मालक होऊ शकता. परंतु एका ट्रिकच्या मदतीनं, तुम्ही ते १ कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकता.

कसा मिळेल १ कोटींचा फंडया एसआयपीमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये ५०० रुपयांची वाढ केली (SIP Top-Up), तर तुम्ही सहजपणे कोट्यधीश (How to become crorepati) होऊ शकता. तुम्ही ही ट्रिक वापरल्यास, प्रत्येक महिन्याला ४,५०० रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक तुम्हाला २० वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी १,०७,२६,९२१.४१ रुपये मिळवून देऊ शकते.

टॅग्स :गुंतवणूकपैसा