मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर कायम सक्रीय असतात. ट्विटरवरील हटके, जुगाड गाड्या पाहून ते अनेकदा प्रभावित होतात. त्यातूनच, गावाकडच्या जुगाडू लोकांशी त्यांचा स्नेह जुळतो. यापूर्वी सांगली जिल्ह्याती एका जुगाडू जिप्सीचालकाला पाहून त्यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर केला होता. आता, असाच एका दुधवाल्याच्या जुगाडू एफ 1 कारचा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर लक्षावधी फॉलोअर्सही आहेत. कारण, ते सातत्याने ट्विटरवर सक्रीय असून सर्वसामान्य नेटीझन्सलाही अनेकदा रिएक्ट करतात. महिंद्रा हे अनेकांना कार गिफ्ट देण्यामुळे, जुगाडू वाहनांचे व्हिडिओ शेअर करण्यामुळे नेटीझन्ससाठी कमालीचे सक्रीय उद्योजक आहेत. यापूर्वी त्यांनी एका जुगाड जिप्सी बनविलेल्या सांगलीतील व्यक्तीला त्या जिप्सीच्या बदल्यात चक्क महिंद्रा बोलेरो कार दिली होती. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. आता, महिंद्रांनी आणखी एका जुगाडू एफ वन चालक दुधवाल्याच्या भेटीची इच्चा व्यक्त केली आहे. महिंद्रा यांनी तो व्हिडिओ ट्विट करत तसे म्हटलं आहे.
I’m not sure his vehicle meets road regulations, but I hope his passion for wheels remains unregulated…This is the coolest thing I’ve seen in a long while. I want to meet this road warrior… https://t.co/lZbDnge7mo
— anand mahindra (@anandmahindra) April 29, 2022
हे वाहन रस्त्याच्या नियमांची पूर्तता करते की नाही, याबद्दल मला खात्री नाही. मात्र, गाडीच्या चालकाची चाकांबद्दलची आवड अनियंत्रित राहिल्याची मला आशा आहे. मी बऱ्याच काळापासून पाहिलेली ही सर्वात छान गोष्ट आहे. मला या रोड योद्ध्याला भेटायचं आहे, असे ट्विट आनंद महिंद्रांनी केलं आहे. महिंद्रांच्या या ट्विटला अनेकांनी रिप्लाय दिला आहे. संबंधित दूधचालक हा उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आहे. तो दररोज सकाळी अशी दुधवाटपाची राईड करतो, असेही एका युजर्संने उत्तरात लिहिले आहे. त्यामुळे, आता या जुगाडू एफ 1 चालकाची आणि आनंद महिंद्रांची भेट होईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यापूर्वी एका मोपेडचा फोटो केला होता शेअर
आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक हटके ट्विट केलं. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोपेडवर एक व्यक्ती सुमारे ३७ खुर्च्या, अनेक चटई आणि त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचं दिसतं. तसेच, "आता आपल्याला लक्षात येईल की भारत जगात सर्वाधिक दुचाकी का बनवतो. आम्ही टू-व्हिलरची इंच इंच जागा कशी जास्तीत जास्त उपयोगात आणायची आणि जास्त माल कसा न्यायचा याची आम्हाला चांगली माहिती आहे. आम्ही असेच आहोत", असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं. महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.