मुंबई - देशातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील घडामोडींमुळे, त्यांवरील कमेट आणि कंटेंटमुळे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे माध्यमांनाही त्यांच्याकडून काहीतरी नवीन कंटेंट हवा असतो. त्यामुळेच, तेही सोशल मीडिया अकाऊंटवर जास्त एक्टीव्ह असतात. देश-विदेशात घडणाऱ्या घडामोडींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते, या घटनांचे व्हिडिओही ते शेअर करत असतात. त्यासोबतच, इन्नोव्हेटीव्ह बाबींकडे त्याचे आवर्जून लक्ष असते. त्यांच्या या अॅक्टीव्हीटीमुळेच एका ट्विटर युजर्सने त्यांना एक आयडिया दिली आहे.
आनंद महिंद्रा हे ग्रामीण भागातील जुगाडू किंवा लहान-सहान इनोव्हेटीव वस्तूंचे व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतेच, त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्रेडमिल्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे एका कारपेंटरने डोकं लढवून ही ट्रेड मिल्स म्हणजे धावायची मशिन्स बनवली आहे. या मशिन्सचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रांनी मला एक अशी मशिन हवीय, असे ट्विट केलं आहे.
In a world of commoditised, energy hungry devices, the passion for craftsmanship, the hours of dedicated efforts in hand-making this device makes it a work of art, not just a treadmill. I want one… pic.twitter.com/nxeGh6a2kf
— anand mahindra (@anandmahindra) March 24, 2022
महिंद्रा यांचे असेच एन्नोव्हेटीव्ह ट्विट कायम चर्चेत असतात. चारचाकी कार असतील किंवा तशाच पद्धतीचे काही मॉडेल्स असतील ते ट्विटरवरुन शेअर करत असतात. यापू्र्वी सांगलीतील एका व्यक्तीने बनवलेल्या जुगाडू जिप्सीचा फोटो त्यांनी शेअर केला होता. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला होता, ती जिप्सी आनंद महिंद्रांना खूप आवडली होती. त्यामुळे, त्या जिप्सीच्या बदल्यात त्यांनी नवी कोरी बोलेरो कार त्या व्यक्तीला भेट दिली होती. महिंद्रांच्या याच संकल्पनेचून एका ट्विटर युजर्संने त्यांना एक भन्नाट आयडिया दिली आहे. विशेष म्हणजे ती आयडिया वाचून महिंद्रांनीही इंटरेस्टींग.. धन्यवाद असा रिप्लाय त्या युजरला दिला आहे.
Interesting thought. Thank you. https://t.co/WHFUTI2aSL— anand mahindra (@anandmahindra) March 23, 2022
अंशू चौधरी नामक युजर्सने आनंद महिंद्रांना एक चॅनेल सुरू करण्याचं सूचवलं. नवीन ईनोव्हेटीव्ह प्रोडक्टचे लाँचिंग या चॅनेलद्वारे करा आणि त्या वस्तू महिंद्रा नावाच्या ब्रँडने बाजारात विक्रीस ठेवा, असे अंशून सुचवले आहे. अंशूच्या या सूचनेला आनंद महिंद्रांनी इंटरेस्टींग असं म्हटलंय. त्यामुळे, खरंच, आनंद महिंद्रा असं चॅनेल सुरू करतील हा प्रश्न अनेकांना पडलाय.