मुंबई- महिंद्राच्या गाड्या बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. या गाड्या ग्राहकांच्याही चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे महिंद्रा ही कंपनी ग्राहकांना चांगल्या सोयी-सुविधांनी युक्त गाड्या उपलब्ध करून देत असते. उद्योगपती आनंद महिंद्रा आज ट्विट करून Alturas G4 या गाडीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी TUV300 गाडीलाही ग्रे होस्ट नाव दिलं आहे. ही माहिती आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांना असंही वाटतं की, ट्विटर युजर्सनं त्यांच्या गाडीला नाव सुचवावं. ज्यानं सुचवलेलं नाव मला आवडेल, त्याला दोन गाड्या गिफ्ट स्वरूपात देणार असल्याचंही आनंद महिंद्रा यांनी जाहीर केलं आहे.
आनंद ट्विट करत म्हणाले, अखेर माझी Alturas G4 ही बाजारात आली. मी माझ्या TUV300 Plus गाडीला Grey Host नाव दिलं आहे. या सुंदर गाडीसाठी एक नवं नाव पाहिजे. सगळ्यांनी त्यासाठी नावं सुचवावीत. ज्यांनी सुचवलेली नावं मला आवडतील, त्यांना महिंद्राच्या दोन गाड्या गिफ्ट स्वरूपात देऊ. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर लोकांनी या गाडीला ट्विटवरून नाव सुचवण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्सनी सुचवलेली नावं आनंद महिंद्रा यांच्या पसंतीसही पडली.
Finally took delivery of my Alturas G4. I named my TUV 3OO plus the ‘Grey Ghost.’ Need a name for this new beautiful beast. All ideas welcome. The person who suggests the chosen name will get 2 Mahindra die cast scale models (Not the Alturas scale model—that’s not ready yet!) pic.twitter.com/KbvAxOAwvk
— anand mahindra (@anandmahindra) January 16, 2019
एका युजर्सनं सांगितलं आहे की, गाडीचं नाव कालभस्म ठेवा, हा संस्कृत शब्द आहे. चैतन्य लिहितो, त्या गाडीचं बुद्दुसुरी नाव ठेवलं पाहिजे. हा कन्नड शब्द आहे, ज्याचा अर्थ ग्रे अॅनिमल. राजेश लिहितो, आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्या गाडीचं नाव जटायू ठेवलं पाहिजे. एकंदरीत आनंद महिंद्राच्या या TUV300 Plus गाडीला नाव सुचवण्यासाठी वाचकांच्या उड्या पडत आहेत.
Yes I would prefer to use a name this time from an Indian language...Keep the ideas coming... https://t.co/I9CZlZPQ4I
— anand mahindra (@anandmahindra) January 16, 2019