नवी दिल्ली : आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर (Anand Mahindra Twitter) इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये तयार करण्यात आलेल्या एका 'कॅफे'चा फोटो शेअर केला आहे. तसेच, आनंद महिंद्रा यांना ही व्यवसायाची आयडिया भन्नाट वाटली आहे.
आनंद महिंद्रा यांनी या कॉफी शॉपच्या कल्पनेला 'Enterprising' म्हटले आहे. याचबरोबर, त्यांच्या आवडण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे त्यांच्या कंपनीची इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा Treo Zor या कामासाठी निवडण्यात आली आहे.
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवरून (Anand Mahindra Tweet) समजते की, हे मोबाईल कॉफी शॉप बास्क असोसिएट्सने हैदराबादमध्ये उघडले आहे. कंपनीने 5 इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचे कॉफी शॉपमध्ये रूपांतर केले आहे. 'Coffee On The Go' या ब्रँड नावाने कंपनी हा व्यवसाय करत आहे.
इको-फ्रेंडली कॉफी शॉप हे कॉफी शॉप इको-फ्रेंडली आहे. कॉफी शॉपबद्दल म्हटले आहे की, हे पूर्णपणे शून्य प्रदूषण कॉफी शॉप आहे, कारण या दुकानात सेंद्रिय कॉफी कप वापरण्यात आले आहेत. कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्यात आला असून उर्वरित कॉफी पावडर खत म्हणून वापरली आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनामुळे प्रदूषणही होत नाही.
13,000 हून अधिक युनिट्सची विक्रीमहिंद्रा इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक 3-व्हीलर Treo ने लॉन्च झाल्यापासून 13,000 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, या ऑटो रिक्षाचा देखभाल खर्च प्रति किमी जवळपास 50 पैसे येतो. तसेच, 5 वर्षात रिक्षा मालकाचे 2 लाख रुपये वाचवतात. Mahindra Treo ला वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफ बॅटरी पॅक देण्यात आले आहे. तसेच, रिक्षाची 8kW बॅटरी IP65 रेटेड आहे. हे 42 Nm टॉर्क जनरेट करते. Treo 16A सॉकेट वापरून चार्ज केला जाऊ शकतो. सध्या ते ऑटो-फिक्स बॅटरीसह येते, परंतु कंपनी स्वॅप करण्यायोग्य बॅटरी व्हर्जनवर काम करत आहे.