नवी दिल्ली-
सहसा आपण जेव्हा एखाकी पवनचक्की पाहातो तेव्हा आपल्याला उंच टॉवर आणि त्यावर लावलेले तीन मोठे ब्लेड दिसून येतात. की जे वाऱ्याच्या वेगाच्या सहाय्यानं फिरत असतात. पण तंत्रज्ञानाच्या मदतीनं असे विंड टर्बाईन बनवले गेले की जे सर्वसामान्य घराच्या छतावर किंवा ऑफीसच्या छतावरही सहज लावता येतील. यातून फायदा असा की तुम्हाला त्यातून मोफत वीज प्राप्त होईल आणि वीजेच्या बिलापासून कायमस्वरुपी सुटका होईल.
ऐकूनच किती भारी वाटतं ना? हो, हे शक्य आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशाच एका विंड टर्बाइनचा व्हिडिओ शेअर केला आहे. याचं नाव आहे Tulip Wind Turbine आणि याचं वैशिट्य असं की ती अतिशय कमीत कमी जागेत उभारली जाऊ शकते. यासाठी ना मोठ्या टॉवरची गरज आहे ना जमिनीची.
वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे Tulip Wind Turbine
तुलिप विंड टर्बाइनच्या दोन पंख्यात हवा आली की त्याच्या मदतीनं टर्बाइनची इतर पंखेही फिरू लागतात. अशावेळी कमीत कमी किमतीत आणि खर्चात ग्रीन एनर्जीची निर्मिती होते. कमी हवेतही वीज निर्मितीची क्षमता या टर्बाइनची आहे. इतकंच नव्हे, तर हे टर्बाइन विविध रंगात उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही त्याचा तुमच्या होम डेकोरचाही भाग बनवू शकता. तुमच्या घराच्या कलर थीमनुसार तुम्ही टर्बाइनची निवड करू शकता.
I often wondered how massive allocations of land (and air, given their height!) for traditional turbines would be sustainable? Multiple forms of generation should be welcomed. For India, tulip turbines are ideal: lower cost, lower space & useful in both urban & rural settings. pic.twitter.com/j6ychzdGmK
— anand mahindra (@anandmahindra) October 21, 2022
आनंद महिंद्रा म्हणाले...भारतासाठी उत्तम पर्याय
विंड टर्बाइनचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी त्यांची प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केली आहे. "मी नेहमी विचार करतो की पारंपारिक टर्बाइनसाठी इतकी जमीन आणि उंचीवर ते बसवणं नेमकं किती काळ चालणार? ऊर्जेच्या निर्मितीसाठी अशा नव्या पर्यायांचं स्वागत केलं पाहिजे", असं आनंद महिंद्रा म्हणाले. भारतासाठी तुलिप टर्बाइन एक आदर्श असल्याचंही ते म्हणाले. कमीत कमी खर्चात आणि शहरी तसंच ग्रामीण भागातही घराच्या छतावर हे इन्स्टॉल केलं जाऊ शकतं.