Lokmat Money > बिझनेस न्यूज > आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर जबरदस्त पसंती मिळत आहे.

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 30, 2020 02:39 PM2020-12-30T14:39:07+5:302020-12-30T14:44:19+5:30

आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर जबरदस्त पसंती मिळत आहे.

Anand mahindra tweeted video and say I will not complain about 2020 being a difficult year after having seen this. | आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

Highlightsआनंद महिंद्रा हे ट्विटरवर सातत्याने सक्रिय असतात. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर जबरदस्त पसंती मिळत आहे. त्यांच्या अनेक ट्विट्सना युझर्सची पसंतीही मिळते.

मुबई -महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे ट्विटरवर सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या अनेक ट्विट्सना युझर्सची पसंतीही मिळते. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर जबरदस्त पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले आहे, ”हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वर्ष 2020 किती कठीन राहिले, या विषयी मी तक्रार करणार नाही. मल्लेश्वर राव मी तुम्हाला सॅल्यूट करतो आणि मी तुम्हाला सपोर्ट करतो. जेव्हा आपण इतरांच्या अडचणी कमी करत असतो, तेव्हा आयुष्य कठीण नसते." 

आनंद महिंद्रा यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सांगण्यात आले आहे, की हैदराबाद येथील मल्लेश्वर राव पार्टीतील उरलेले अन्न कशा प्रकारे गरजू मुलांना वाटतात. पेशाने इंजिनिअर असलेले मल्लेश्वर राव रोज जवळपास 500 ते 2 हजार लोकांना भोजन देतात. मल्लेश्वर राव यांनी 2011मध्ये ‘डू नॉट वेस्ट फूड’ मोहिमेला सुरुवात केली होती. आता त्यांची टीम कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात उरलेले भोजन जमा करते आणि ते खाण्या योग्य असल्यास गरजू लोकांत वाटते.

लहान वयातच राव यांना जाणीव झाली, की आपल्याला उपजिविकेसाठी कमवावे लागेल. त्यांनी बालमजूर म्हणूनही काम केले. मात्र सामाजिक कार्यकर्ता हेमलता लावानम यांची भेट झाल्यानंतर त्यांचे जीवन बदलले. यानंतर गरजू मुलांच्या शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगदेखील केले. 

राव मोठ्या शहरात आल्यानंतर, येथे राहण्यासाठी किती खर्च येईल हे त्यांना माहीत नव्हते. राव यांनी सांगितले, की त्यांच्या एका मित्राने सांगितले होते, की केटरिंगच्या कामातून पैसे कमावले जाऊ शकतात. यानंतर त्यांनी पार्टटाईम नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मोठ्या कार्यक्रमांमध्ये की अन्न वाया जाते. यानंतर त्यांनी या कार्यक्रमातील उरलेले अन्न गरजू लोकांना वाटायला सुरुवात केली. समाजासाठी कशा पद्धतीने योगदान दिले जाऊ शकते हे आपण शाळेत शिकलो, असे राव सांगतात. एवढेच नाही, तर ज्या लोकांना भोजन दान करण्याची इच्छा आहे, असे लोकही आता राव यांच्याशी संपर्क साधतात. 

Web Title: Anand mahindra tweeted video and say I will not complain about 2020 being a difficult year after having seen this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.