Join us  

Anand Mahindra: आनंद महिंद्रांना युजर्सने विचारलं वय? उद्योगपतींनी दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 3:15 PM

ट्विटरवरुन कधी चाहत्यांना पझल देत, कधी खेळाडूंना चारचाकी गाडी भेट देत, तर कधी सांगली जिल्ह्यातल्या एखाद्या जुगाडू व्यक्तीच्या कारला दाद देत

मुंबई - सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक एक्टीव्ह असलेले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्राचं नाव घेतलं जातं. त्यांच्या सोशल मीडियावरील भूमिकांचं किंवा विधानांचं बातमी मुल्यही असतं. महिंद्रा यांच्या व्यावसायिक कौशल्याव्यतिरिक्त लोक त्यांच्या सेंस ऑफ ह्यूमरचे सुद्धा लाखो चाहते (Fan) आहेत. कधी प्रेरणादायी कोट्स, व्हिडिओ शेअर करुन तर कधी सर्वसामान्य युजर्संला रिप्लाय देऊन ते सोशल मीडियात चर्चेत असतात. आताही एका ट्विटर युजर्संच्या प्रश्नाला महिंद्रांनी आनंदी उत्तर दिलं आहे. 

ट्विटरवरुन कधी चाहत्यांना पझल देत, कधी खेळाडूंना चारचाकी गाडी भेट देत, तर कधी सांगली जिल्ह्यातल्या एखाद्या जुगाडू व्यक्तीच्या कारला दाद देत, महिंद्रा बोलेरो त्याच्या दारात उभी करत, अशा अनेक एक्टीव्हिटीमुळे आनंद महिंद्रा हे उद्योजक आणि सोशल युजर म्हणून घराघरात पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडली अम्माला त्यांनी घर गिफ्ट दिलं होतं. विशेष म्हणजे मदर्स डेचे निमित्त साधत त्यांनी गरीब अम्मला घर दिल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावा झाला होता. आता, ट्विटरवर एका युजर्सने त्यांना वयासंदर्भात प्रश्न विचारला आहे. त्यावरही त्यांनी भन्नाट रिप्लाय दिला आहे.  मि. आनंदजी तुमचं वय किती? असा प्रश्न केशवा एनवायसी या ट्विटर युजर्सने विचारला होता. त्यावर, आनंद महिंद्रा यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. काय? असा प्रतिप्रश्न करत, गुगल काका जे उत्तर देईल, त्यावर तुमचा विश्वास नाही का, असा प्रतिप्रश्नही महिंद्रा यांनी केला आहे. महिंद्रांचे हे ट्विटही मिश्कीलपणे असल्याने चर्चेत आहे.  

रोहित शेट्टींनाही काढला होता चिमटा

महिंद्राची एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) या नावाने बाजारात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना अनुसरून एक ट्विट केले होते. "रोहित शेट्टीजी, गाडी उडवण्यासाठी तुम्हाला आता एका अणुबॉम्बची आवश्यकता भासेल....", असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.  

टॅग्स :आनंद महिंद्राट्विटरसोशल मीडियागुगल