Join us

NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 1:00 PM

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली.

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. यावर वरकडी म्हणून सुब्रमण्यम याचा पगार वार्षिक १५ लाखांवरून तब्बल ४ कोटी २१ लाख रुपये इतका करण्यात आला. यासह अनेक निर्णय चित्रा यांनी केवळ एका साधूच्या सांगण्यावरून घेतले असे सेबीच्या तपासात समोर आले आले होते. दरम्यान, आता सीबीआयनं या प्रकरणी आनंद सुब्रह्मण्यम याला अट केली आहे.  

सीबीआयनं आनंद सुब्रह्मण्यमला चेन्नईवरून अटक केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. दरम्यान, ही अटक एनएसई को लोकेशन स्कॅमबाबत झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घोटाळ्यात करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे. आनंद सुब्रह्मण्यमला त्याच्या चेन्नईतील घरातून गुरूवाती रात्री उशिरा अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्रीसाधूच्या सांगण्यावरून शेअर बाजारात निर्णय घेणाऱ्या एनएसईच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांच्यावर सेबीकडून कारवाई करण्याआधीच काही दिवस अगोदर एनएसईच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. एनएसईच्या समभाग ट्रान्स्फर डेटामध्ये ही माहिती दिसून आली असून, यात मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

एनएसईच्या संकेतस्थळावर असलेल्या डेटानुसार, एनएसईच्या समभागांमध्ये २०९ व्यवहार झाले. यातील तब्बल एक तृतीयांश विदेशी भागधारकांशी जोडलेले आहेत. असे दिसते की, या परदेशी भागधारकांनी एनएसईचे समभाग भागधारकांना विकले. विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ११.६१ लाख समभाग १,६५० आणि २,८०० रुपयांच्या किमतीमध्ये विकले. याचा थेट संबंध शेअर बाजारातील कोट्यवधींच्या को-लोकेशन घोटाळ्याशी असण्याचा संशय आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुन्हा अन्वेषण विभाग