Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anant-Radhika Wedding: Anant Ambani आणि Radhika Merchant यांचा विवाह, बीकेसीतील ऑफिसेसना WFH, हॉटेल्स फुल

Anant-Radhika Wedding: Anant Ambani आणि Radhika Merchant यांचा विवाह, बीकेसीतील ऑफिसेसना WFH, हॉटेल्स फुल

Anant-Radhika Wedding: आज राधिक मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये हा विवाह सोहळा पार पडेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:17 PM2024-07-12T12:17:24+5:302024-07-12T12:18:08+5:30

Anant-Radhika Wedding: आज राधिक मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये हा विवाह सोहळा पार पडेल.

Anant Ambani and Radhika Merchant wedding mumbai bkc offices work from hotels full | Anant-Radhika Wedding: Anant Ambani आणि Radhika Merchant यांचा विवाह, बीकेसीतील ऑफिसेसना WFH, हॉटेल्स फुल

Anant-Radhika Wedding: Anant Ambani आणि Radhika Merchant यांचा विवाह, बीकेसीतील ऑफिसेसना WFH, हॉटेल्स फुल

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : आजपासून तीन दिवसांत तुम्ही मुंबईला येणार असाल आणि ताज किंवा ललित हॉटेलमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तिथे रूम मिळण्याची शक्यता कमी आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  (Anant Ambani-Radhika Merchant Wedding) राधिका मर्चंट यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अंबानींच्या मुलाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सर्व मोठी हॉटेल्स जवळपास पूर्णपणे बूक झाल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर बीकेसीतील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम घेण्यास सांगितल्याची माहिती समोर आलीये.

१५ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट Anant-Radhika Wedding यांच्या लग्नाचा सोहळा १२ जुलै २०२४ रोजी पार पडणार आहे. बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा तीन दिवसीय विवाह सोहळा पार पडेल. अंबानी कुटुंबीयांच्या या भव्य सोहळ्यात जगभरातील सेलिब्रिटी येणार असून त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलीये. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) ज्या ठिकाणी हा सोहळा होणार आहे, तेथील काही कंपन्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत घरून (WFH) काम करण्यास सांगण्यात आलंय, कारण या लग्नासाठी काही रस्ते वळविण्यात आलेत आणि सामान्य वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

लॉस एंजेलिसवरुन येणार फोटोग्राफर

या भव्य विवाह सोहळ्यातील संस्मरणीय क्षण टिपण्यासाठी लॉस एंजेलिसहून फोटोग्राफर्स आणि कॅमेरापर्सनलाही बोलावण्यात आलं आहे. मुकेश अंबानी यांनी या परदेशी पाहुण्यांसाठी खासगी जेटची व्यवस्था केलीये. याशिवाय मुंबईतील आयटीसी, हॉटेल ललित आणि ताज हॉटेल सारखी हॉटेल्स त्यांच्या मुक्कामासाठी पूर्णपणे बुक करण्यात आलीत. अनंत अंबानी आणि राधिका Anant-Radhika Wedding यांच्या विवाहसोळ्यासाठी जगभरातून अनेक पाहूणे येणार आहेत. यामध्ये राजकारण्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंतचा समावेश आहे.

Web Title: Anant Ambani and Radhika Merchant wedding mumbai bkc offices work from hotels full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.