मुंबई : संपूर्ण देश पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पेट्रोल फक्त ६९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तेथे व्हॅटचा दर सर्वात कमी ६ टक्के असल्याने इंधन तब्बल २० रुपये स्वस्त आहे. महाराष्टÑातील व्हॅटचा दर ३९ टक्के आहे. त्यामुळे महागाईच्या झळा राज्यातील नागरिकांनाच सर्वाधिक बसत आहेत.खनिज तेलाच्या शुद्धिकरणानंतर पेट्रोल-डिझेलची किंमत सध्या ३८ ते ४० रुपये प्रति लीटर होते. त्यावर केंद्र सरकारचे १९.४८ रुपये उत्पादन शुल्क, पंपमालकाचे अडीच ते तीन रुपये कमिशन व अखेरीस राज्य सरकारचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) लावला जातो. महाराष्टÑ सरकार तर व्हॅटखेरीज ९ रुपये दुष्काळी अधिभारही आकारते. यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात पेट्रोलवरील कराचा दर सध्या ३९.१२ टक्के व डिझेलवरील हा दर २४.७८ टक्के आहे. त्यामुळेच आज राज्यातील अनेक भागांत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे.महाराष्टÑाच्या शेजारील गुजरातमध्ये पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटचा दर २५.४५ आणि २५.५५ टक्के, कर्नाटकमध्ये ३०.२८ आणि २०.२३ टक्के, मध्य प्रदेशात ३५.७८ आणि २३.२२ टक्के, तेलंगणात ३३.३१ आणि २६.०१ टक्के तर गोव्यात हा दर फक्त १६.६६ व १८.८८ टक्के आहे.> तीनच राज्यात मोठा करमहाराष्टÑाखेरीज अन्य फक्त दोनच राज्ये पेट्रोलवर ३५ टक्क्यांहून अधिक व्हॅट आकारतात. त्यामध्ये आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. १९ राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांमधील पेट्रोलवरील व्हॅटचा दर ३० टक्क्यांहून कमी आहे. १७ राज्यांमध्ये डिझेलवरील व्हॅटचा दर २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने इंधन दरवाढअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याने, देशात पेट्रोलच्या दरात वाढ झाली. खनिज तेल डॉलरच्या माध्यमातून खरेदी होत असल्याने समस्या निर्माण झाल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
अंदमान भारतात तरी तेथे पेट्रोलचा दर ६९ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:11 AM