Join us  

अँड्रॉईड मोबाइल वापरणाऱ्यांनो सावधान !

By admin | Published: November 18, 2016 2:26 AM

व्हॉट्स अ‍ॅपने नवीन सेवा सुरू केली असून, ती त्रासदायक ठरत आहे. या सेवेद्वारे ग्राहक ज्यावेळी एखादा ग्रुप तयार करतो त्यावेळी या ग्रुपमध्ये नवीन सदस्य

राजू ठाकरे
नाशिक, दि. 18- व्हॉट्स अ‍ॅपने नवीन सेवा सुरू केली असून, ती त्रासदायक ठरत आहे. या सेवेद्वारे ग्राहक ज्यावेळी एखादा ग्रुप तयार करतो त्यावेळी या ग्रुपमध्ये नवीन सदस्य समाविष्ट करण्यासाठी ग्रुप अ‍ॅडमिनला लिंक तयार करता येते.तयार केलेली ही नवीन लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून नंतर कुठपर्यंत पोहचू शकते व त्या लिंकच्या साहाय्याने या ग्रुपमध्ये जगभरातून कोण कोण सदस्य सभासद होऊ शकतो याच्या बाबतीत ग्रुप अ‍ॅडमिनदेखील नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा लिंकचा वापर करून अनेकदा पाकिस्तानी, चिनी, बांगलादेशी अशा भागांतील इस्लामिक जेहादी आतंकवादी, माओवादी, वामपंथी, कम्युनिस्ट, देशद्रोही संघचनांचे सदस्य, देशातील अनेक गोपनीय माहिती जाणून घेऊन त्याचा दुरुपयोग करू शकतात. अशा व्यक्ती आपल्या देशातील सदस्यांचे मोबाइल हॅक करणे, मोबाइलमधील नंबर व इतर माहिती कॉपी करणे व या माहितीचा दुरुपयोग करणे, अशा स्वरूपाचे षड्यंत्र रचू शकतात. आपल्या देशातील अशांतता पसरवू पाहणाºया व्यक्ती या लिंकच्या साहाय्याने स्वता:हून अशा    भारतीय व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे सदस्य होतात. अशा व्यक्ती सदस्य होऊन फोन हॅक करण्याचा प्रयत्न करुन देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करू पाहत असतात. अशा ग्रुपवर अनेकदा परदेशी सदस्यांमुळे मतभेद निर्माण होतात व आक्षेपार्ह मजकूरांची देवाण-घेवाण होते. परिणामी याचा त्रास सर्व सदस्यांना होतो व वेळेप्रसंगी ग्रुप अ‍ॅडमिन व सभासदांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनने खबरदारी ठेवण्याची गरज आहे.
 
आपण अ‍ॅडमिन अथवा सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये जर +92, +86, +880, +96 अथवा +97 अशी मोबाईल क्रमांकाची सुरवात असलेले परदेशी सदस्य असतील तर अशा सदस्यांना त्वरित ग्रुपमधून बाहेर काढा. +91 ने सुरूवात होणारे क्रमांक हेच भारतीय फोन / मोबाइल क्रमांक असून, याची माहिती इतरांनाही द्यावी. 
 
+92 अशी सुरूवात असलेले क्रमांक पाकिस्तानी असतात तर + 86 सुरूवात असलेले क्रमांक चीनमधील आहेत. +880 सुरूवात असलेले क्रमांक हे बांगलादेशी तर +96 अथवा +97 ने सुरूवात होणारे क्रमांक हे अरबच्या मध्य पूर्वच्या भागातील तर काही भाग खाडी भागातील आहे.­­
 
 
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधानी बाळगणे गरजेचे आहे. अशा ग्रुप विषयी माहिती मिळणेकामी पोलिसांना जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे, माहीती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवले जाईल. कोणतिही अफवा न पसरविता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त.