सॅन फ्रॅन्सिस्को : अॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन वापरकर्त्याचा स्थळ तपशील (लोकेशन डाटा) गोळा करीत असल्याचे गूगलने मान्य केले आहे. गूगलच्या कबुलीनुसार, फोनची स्थळ सेवा (लोकेशन सर्व्हिस) बंद करून ठेवण्यात आली अथवा फोनमध्ये सीमकार्ड नसले तरी अॅण्ड्रॉइड यंत्रणा ग्राहकाचा स्थळ तपशील गोळा करून गूगलला पाठवीत राहतो. यामुळे अॅण्ड्रॉइड फोन वापरणा-या लोकांची वैयक्तिक गोपनीयता धोक्यात आली आहे.
क्वार्ट्झने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या स्थळाचा तपशील उघड होऊ नये यासाठी तुम्ही कितीही काळजी घेतली तरी अॅण्ड्रॉइड सॉफ्टवेअर तुमचा डाटा गोळा करून गूगलला पाठवीत राहते. फोन इंटरनेटला जोडला जाताच ही प्रक्रिया सुरू होते. हा तपशील गूगलला प्राप्त होत राहतो.
गूगलने यासंबंधीची कबुली दिली आहे. गूगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, संदेश पोहोच व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आम्ही जानेवारीमध्ये सेल आयडी कोडचा अतिरिक्त सिग्नल म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे.
तुम्ही कोठे आहात, याचा माग ठेवतोय अॅण्ड्रॉइड फोन, गूगलने दिली कबुली
सॅन फ्रॅन्सिस्को : अॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन वापरकर्त्याचा स्थळ तपशील (लोकेशन डाटा) गोळा करीत असल्याचे गूगलने मान्य केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:40 AM2017-11-23T03:40:39+5:302017-11-23T03:40:47+5:30