Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anil Ambani यांना दिलासा, कर्जात बुडलेल्या कंपनीची विक्री; पाहा कोण आहे खरेदीदार आणि किंमत

Anil Ambani यांना दिलासा, कर्जात बुडलेल्या कंपनीची विक्री; पाहा कोण आहे खरेदीदार आणि किंमत

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि कितीला झालं डील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 03:34 PM2022-10-15T15:34:01+5:302022-10-15T15:34:24+5:30

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि कितीला झालं डील.

anil ambani led reliance capital subsidiary reliance commercial finance acquired by authum investment know details | Anil Ambani यांना दिलासा, कर्जात बुडलेल्या कंपनीची विक्री; पाहा कोण आहे खरेदीदार आणि किंमत

Anil Ambani यांना दिलासा, कर्जात बुडलेल्या कंपनीची विक्री; पाहा कोण आहे खरेदीदार आणि किंमत

अनिल अंबानींच्या (Anil Ambani) कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलची (Reliance capital) उपकंपनी असलेल्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडची अखेर विक्री झाली. ऑथम इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरने (Authum Investment and Infrastructure) शुक्रवारी कर्जबाजारी रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) 1 कोटी रुपयांना विकत घेतले. रिलायन्स कॅपिटलने शुक्रवारी ही माहिती दिली.

कंपनीनं यासंदर्भात नियमकालाही माहिती दिली. कंपनीनं भारतीय रिझर्व्ह बँक (प्रूडेन्शिअल फ्रेमवर्क फॉर स्ट्रेस रिझॉल्युशन) च्या संदर्भात RCFL च्या रिझोल्यूशन प्लॅनच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, पूर्ण मालकीच्या RCFL मधील आपला हिस्सा Autumn Investment and Infrastructure Limited ला विकला आहे, असं कंपनीनं नियामकाला सांगितलं.

१ कोटींना डील

ऑटम इन्व्हेस्टमेंट्सनं आरसीएफएलला 1 कोटी रुपयांना खरेदी केलं. रिलायन्स कॅपिटलची ही पहिली उपकंपनी आहे ज्यावर यशस्वीरित्या तोडगा काढण्यात आला आहे.

 

Web Title: anil ambani led reliance capital subsidiary reliance commercial finance acquired by authum investment know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.