Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या 'या' कंपनीत गुंतवणूक करताय? मग आधी ही बातमी वाचा...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीत गुंतवणूक करताय? मग आधी ही बातमी वाचा...

एका महिन्यात अनिल अंबानींच्या या कंपनीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:51 PM2022-09-30T14:51:10+5:302022-09-30T14:54:39+5:30

एका महिन्यात अनिल अंबानींच्या या कंपनीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

Anil Ambani led reliance infrastructure stock price and performance | अनिल अंबानींच्या 'या' कंपनीत गुंतवणूक करताय? मग आधी ही बातमी वाचा...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीत गुंतवणूक करताय? मग आधी ही बातमी वाचा...

Anil Ambani: एकीकडे मुकेश अंबानी यशाची शिखरे सर करत आहेत, तर दुसरीकडे अनिल अंबानी सातत्याने अपयशाची चव चाखत आहेत. यातच आता कर्जाच्या जाळ्यात अडकलेली अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. कंपनीचे शेअर्स महिनाभरात झपाट्याने खाली आले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा स्टॉक गेल्या एका महिन्यात सुमारे 13% घसरला आहे. 

स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर होता
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉकने 2 सप्टेंबर 2022 रोजी 201.35 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता. हा त्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता. मात्र, त्यानंतर शेअर झपाट्याने खाली आला. सध्या या शेअरची किंमत 140 रुपयांच्या खाली आली आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांचे प्रति शेअर 60 रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. 

रिलायन्स इन्फ्राने अदानी समूहाच्या कंपनीसोबत कायदेशीर लढाई लढण्यासाठी पावले उचलली असताना शेअरमध्ये ही घसरण झाली. सप्टेंबरच्या सुरुवातीला रिलायन्स इन्फ्राने अदानी ग्रुपची कंपनी, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड विरुद्ध मुंबई सेंटर फॉर इंटरनॅशनल आर्बिट्रेशनशी संपर्क साधला आहे. रिलायन्स आणि अदानी ग्रुपच्या कंपनीमध्ये 5 वर्षे जुन्या करारावरून वाद सुरू आहे.

Web Title: Anil Ambani led reliance infrastructure stock price and performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.