Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स पॉवरचा (Reliance Power) शेअर 1 रुपयांवरून 20 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:53 PM2023-09-28T15:53:09+5:302023-09-28T15:53:36+5:30

अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स पॉवरचा (Reliance Power) शेअर 1 रुपयांवरून 20 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ...

anil ambani reliance power share crossed rs20 rupee level from rs1 Delivered 1650 percent return | ₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स पॉवरचा (Reliance Power) शेअर 1 रुपयांवरून 20 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गुरुवारी चांगली तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर 4 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 20.12 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 22.05 रुपये, तर निचांक 9.05 रुपये एवढा आहे.

1 रुपयांवरून 20 रुपयांवर पोहोचला शेअर - 
रिलायन्स पॉवरचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर होता. तो 28 सप्टेंबर 2023 रोजी 20.12 रुपयांवर पोहोचला. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये साधारणपणे साडे तीन वर्षांत 1650 टक्क्यांची उसळी आली आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 117 टक्क्यांची उसळी घेतली आहे.  या कालावधीत कंपनीचा शेअर 9.16 रुपयांवरून 20.12 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये जवळपास 35 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

रिलायन्स पॉवर आणि इंफ्रामध्ये 1043 कोटींची गुंतवणूक करणार कंपनी - 
अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर, या 2 लिस्टेड कंपन्या 1043 कोटी रुपये लावत आहेत. हा पैसा रिलायन्स कमर्शिअल फायनान्सच्या माध्यमाने उभारला जात आहे. रिलायन्स कमर्शिअल फायनान्स, ऑटम इन्व्हेस्टमेन्ट अँड इंफ्रास्ट्रक्चरची संपूर्ण मालकी असलेली कंपनी आहे. हा पैसा प्रेफरन्शियल शेअर जारी करून उभारण्यात आला आहे. रिलायन्स कमर्शियल फायनान्स ही आधी अनिल अंबानी समूहाची कंपनी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑटम इन्व्हेस्टमेन्ट अँड इंफ्रास्ट्रक्चरने ही कंपनी विकत घेतली आहे.

Web Title: anil ambani reliance power share crossed rs20 rupee level from rs1 Delivered 1650 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.