मुंबई: अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालक पदाचा आज राजीनामा दिला आहे. दुसऱ्या तिमाहीत 30,142 कोटींच्या नुकासानीनंतर अनिल अंबानींसह चार अधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिला आहे.
बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानीसह मंजरी केकर, सुरेश रंगाचर व छाया विरानी यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
तिमाही निकालात रिलायन्स कम्युनिकेशनला 30,142 कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले होते. कॉर्पोरेट विश्वात व्होडफोन-आयडिया यांच्या तोट्यानंतर एखाद्या कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 1141 कोटीचा नफा कमावला होता. यानंतर दिवाळखोरी प्रक्रियेतंर्गत कंपनीच्या मालमत्तांची विक्री सुरु झाली होती. यानंतर आरकॉमचे शेअर 3.28 टक्क्यांनी पडूल 59 पैसे प्रति शेअर बंद झाले होते.