Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी

अनिल अंबानीच्या या कंपनीच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:44 AM2024-04-04T11:44:18+5:302024-04-04T11:44:40+5:30

अनिल अंबानीच्या या कंपनीच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत.

Anil Ambani s reliance power company share 52 weeks high up more than 2800 percent investors huge profit | अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स बनले रॉकेट, २८००% पेक्षा अधिकची तेजी

रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढून 33.43 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत. या वर्षी 13 मार्चपासून रिलायन्स पॉवरचे शेअर्स 64% वाढलेत. त्याच वेळी, गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 2800% पेक्षा जास्त वाढ झालीये. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 10.30 रुपये आहे.
 

4 वर्षांत 2858% वाढ
 

गेल्या 4 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयांवर होते. 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 33.43 रुपयांवर पोहोचले. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 2858 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आजcas त्या शेअर्सचं सध्याचं मूल्य 29.58 लाख रुपये झालं असतं.
 

वर्षभरात 210% ची वाढ
 

रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही गेल्या वर्षभरात चांगली वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 210% वाढ झाली आहे. 5 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 10.79 रुपयांवर होते. 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 33.43 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 79% वाढ झालीये. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 18.76 रुपयांवरून 33 रुपयांपर्यंत वाढलेत. तर गेल्या एका महिन्यात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 43% वाढ झाली आहे. अलीकडेच, रिलायन्स पॉवरनं आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेची थकबाकी भरल्याची बातमी समोर आली होती.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

Web Title: Anil Ambani s reliance power company share 52 weeks high up more than 2800 percent investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.