Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींची दिवाळखोर कंपनी विकली, करार होताच शेअर बनला रॉकेट...

अनिल अंबानींची दिवाळखोर कंपनी विकली, करार होताच शेअर बनला रॉकेट...

अनिल अंबानी यांची रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी विकल्या गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 07:00 PM2023-10-30T19:00:30+5:302023-10-30T19:01:09+5:30

अनिल अंबानी यांची रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी विकल्या गेली आहे.

Anil Ambani: swan-energy-completes-acquisition-of-anil-ambani-reliance-naval-stock-rise-like-rocket | अनिल अंबानींची दिवाळखोर कंपनी विकली, करार होताच शेअर बनला रॉकेट...

अनिल अंबानींची दिवाळखोर कंपनी विकली, करार होताच शेअर बनला रॉकेट...


Anil Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांना मोठा झटका बसला आहे. सोलर प्लांट इन्स्टॉलेशन फर्म 'स्वान एनर्जी'ने(Swan Energy Shares), अनिल यांच्या रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (RNIL) कंपनीचे अधिग्रहन केले आहे. यामुळे स्वान एनर्जीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी शेअरमध्ये 19 टक्क्यांची वाढ दिसून आली, तर सोमवारीही शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

कंपनीसाठी ज्यादा पैसे भरले
अनिल अंबानी यांच्या कंपनीसाठी झालेल्या डील अंतर्गत स्वान एनर्जीने आगाऊ रक्कम भरल्याच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्सने वेग पकडला. रिपोर्टनुसार, स्वान एनर्जीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या रिझोल्यूशन प्लॅनद्वारे रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (RNIL) च्या अधिग्रहणासाठी आगाऊ पेमेंट पूर्ण केले आहे. याअंतर्गत 231.42 कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे.

कंपनी प्रचंड कर्जात होती
अनिल अंबानींच्या RNIL च्या 2,133 कोटी रुपयांच्या योजनेला NCLT ने डिसेंबर 2022 मध्ये मान्यता दिली होती. या करारांतर्गत, रिझोल्यूशन जिंकणाऱ्या अर्जदाराने कर्जदारांना सहा हप्त्यांमध्ये पैसे द्यायचे होते आणि कंपनीच्या कर्जदारांना मार्च 2023 पर्यंत आगाऊ पेमेंट म्हणून 293 कोटी रुपयांचा हप्ता जारी करायचा होता. ही रक्कम दिल्याची माहिती स्वान एनर्जीने दिली आहे.

शुक्रवारी स्टॉक रॉकेटसारखा धावला
हप्ता भरल्याच्या बातमीचा थेट परिणाम स्वान एनर्जीच्या शेअर्सवर झाला. गेल्या शुक्रवारी हा स्टॉक 18.58 टक्क्यांच्या वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. व्यवहार संपल्यानंतर त्याचा वेग थोडा कमी झाला आणि तो 12.13 टक्क्यांनी वाढून 368.95 रुपयांवर बंद झाला. स्वान एनर्जी शेअरच्या किमतीतील ही उडी सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही दिसून आली. सोमवारी स्वान एनर्जी लिमिटेडचा शेअर तेजीने उघडला. सोमवारी व्यवहाराच्या शेवटी शेअर 5.23 टक्क्यांच्या वाढीसह 388.50 रुपयांवर बंद झाला. 

(टीप- आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या.)

 

Web Title: Anil Ambani: swan-energy-completes-acquisition-of-anil-ambani-reliance-naval-stock-rise-like-rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.