Join us

अनिल अंबानींची मोठी योजना; 17,600 कोटी रुपये उभारणार, काय आहे कारण? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:06 PM

अनिल अंबानी . आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी गेल्या काही काळापासून आपली रणनिती पूर्णपणे बदलली आहे. आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अशी काही योजना आखली की, आताते हळुहळू कर्जमुक्त होण्याच्या जवळ आहेत. रिलायन्स ग्रुपच्या दोन मोठ्या कंपन्या, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि रिलायन्स पॉवर लिमिटेड जवळजवळ पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.

विशेष म्हणजे, आता रिलायन्स ग्रुप 17,600 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखत आहे. या निधीद्वारे अनिल अंबानी काहीतरी मोठे काम करण्याच्या तयारीत आहेत. विसेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यातच या दोन्ही कंपन्यांनी इक्विटी शेअर्सद्वारे 4,500 कोटी रुपये उभारण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट फंड Varde Partners कडून 7,100 कोटी रुपये उभारण्याची देखील योजना आहे. 

रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, या दोन्ही कंपन्याचे 3,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे, तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे अतिरिक्त 6,000 कोटी रुपये उभे केले जातील. अशा प्रकारे, अनिल अंबानींचा रिलायन्स समूह एकूण 17,600 कोटी रुपये उभारणार आहे.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सगुंतवणूक