Join us

अनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी बुडाली; ट्रेडिंग बंद, संपत्ती विकण्यास NCLT ची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 6:13 PM

अनिल अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आले आहेत.

Anil Ambani: भारतीय उद्योगपती अनिल अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या कंपन्या विकाव्या लागत आहेत. अलीकडेच त्यांच्या रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठीही बोली लावण्यात आली होती. त्यानंतर आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने त्यांची आणखी एक दिवाळखोर कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशनच्या रिअल इस्टेट मालमत्तांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. 

रिलायन्स कम्युनिकेशनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने केलेल्या अर्जाच्या बाबतीत, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई खंडपीठाचा आदेश जोडण्यात आला होता, ज्यामध्ये कंपनीच्या काही बेहिशोबी मालमत्तांच्या विक्रीसाठी NCLT कडून मंजुरी मागितली गेली होती. आता एनसीएलटीने त्याला मान्यता दिली आहे.

कोणती मालमत्ता विकली जाणार?रिलायन्स कम्युनिकेशनच्या विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेत चेन्नईतील हड्डो कार्यालयाचा समावेश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये सुमारे 3.44 एकर जमीन आहे. पुण्यातील 871 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या कार्यालयदेखील विकले जाणार आहे. यासोबतच कॅम्पियन प्रॉपर्टीजच्या शेअर्समधील गुंतवणूक आणि रिलायन्स रियल्टीच्या शेअर्समधील गुंतवणूकही विकली जाईल.

शेअर बाजारातील व्यवहार बंदशेअर बाजारातील रिलायन्स कम्युनिकेशनचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याच्या शेअर्सचा व्यवहार बऱ्याच काळापासून 2.49 रुपयांवर बंद आहे. कंपनीचा व्यापार बीएसईवर प्रतिबंधित करण्यात आला आहे. 11 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 800 रुपये प्रति शेअर दराने व्यवहार करत होते, परंतु आता ते 2.49 रुपयांवर बंद झाले आहेत. अशा प्रकारे कंपनीचे शेअर्स 99 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

कंपनी का बुडाली?मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये रिलायन्स जिओ लॉन्च केले. त्यानंतर बहुतांश लोक जिओकडे वळू लागले. त्याच वेळी रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांमध्ये तीव्र घट झाली. यामुळे कंपनीला मोठा घाटा झाला आणि कंपनी दिवाळखोर झाली.

टॅग्स :अनिल अंबानीमुकेश अंबानीव्यवसायगुंतवणूक