Join us

अनिल अंबानी यांचे वाईट दिवस संपले! आता गौतम अदानींसोबत होणार ₹3000 कोटींची बिग डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 2:17 PM

माध्यमांतील वृतत्तांनुसार, अनिल अंबानींच्या बंद कंपनीचे नशीब बदलणार आहे. गौतम अदानी ही कंपनी विकत बघेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

अनिल अंबानी यांचे दिवस आता बदलायला सुरुवात झाली आहे. कंपन्यांचा तोटा कमी होऊ लागला आहे. कर्जाचा बोजा कमी झाल्याने कंपन्यांचे शेअर्सदेकील पुन्हा एकदा वधारू लागले आहेत. यामुळे, दिवाळखोर कंपन्यांच्या अधिग्रहणालाही वेग आला आहे. अनिल अंबानी यांनी नुक्तीच एक नवीन कंपनीही सुरू केली आहे. यातच आता, अनिल अंबानींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. माध्यमांतील वृतत्तांनुसार, अनिल अंबानींच्या बंद कंपनीचे नशीब बदलणार आहे. गौतम अदानी ही कंपनी विकत बघेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

अदानी खरेदी करणार अनिल अंबानी यांची कंपनी -  माद्यमांतील वृत्तांनुसार, अदानी पॉवर विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या बुटीबोरी थर्मल पॉवर प्लाटचे अधिग्रहण करण्यासाठी सीएफएम अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीसोबत बोलणी करत आहे. या पॉवर प्रोजेक्टचे मूल्य जवळपास 6000 कोटी रुपये एवढे आहे. मात्र सध्या हा प्लांट बंद आहे. महत्वाचे म्हणजे, या डील संदर्भात दोन्ही कंपन्यांकडून कुठल्याही प्रकराचे अदिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. 

3000 कोटी रुपयांत होऊ शकते डील -अदानींपूर्वी, सज्जन जिंदल यांची जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडही अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी उत्सुक होती. मात्र, व्हॅल्यूएशन आणि ऑपरेशनल समस्येमुळे ते मागे झाले. अडानी समूह ही कंपनी 3000 कोटी रुपयांत खरेदी करू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सौद्याचे मूल्य 4 ते 5 कोटी रुपये प्रति मेगावॅटपर्यंत असू शकते. सध्या पॉवर प्लांटमध्ये प्रोडक्शन बंद आहे.

बातमी येताच शेअर चमकले -  ही बातमी आल्यानंतर, रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरला गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 34.57 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 13179 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :अनिल अंबानीगौतम अदानीशेअर बाजार