Join us

अनिल अंबानींचा कमबॅक; एक कंपनी कर्जमुक्त तर दुसरीची वेगाने वाटचाल, अदानींसोबत डील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 17:03 IST

अनेक वर्षांनंतर अनिल अंबानी यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Anil Ambani: एकेकाळी आशिया खंडातील टॉप श्रीमंतांच्या यादीत नाव असणाऱ्या अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती खालावत गेली. परिस्थिती इतकी वाईट झाली की, त्यांना आपल्या कंपन्या गमवाव्या लागल्या. पण, आता त्यांची परिस्थिती हळुहळू सावरत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानींसाठी सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आधी रिलायन्स पॉवर कर्जमुक्त झाली, त्यानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे कर्जही बऱ्यापैकी कमी झाले आहे. आता त्यांच्या आणखी एका कंपनीबाबत चांगली बातमी आली आहे. 

अनिल अंबानींना अच्छे दिन अनेक वर्षांनंतर अनिल अंबानींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी रिलायन्स कम्युनिकेशनला राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLT) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. NCLT ने महाराष्ट्र राज्य कर विभागाची याचिका फेटाळली आहे, ज्यामुळे कंपनीला आर्थिक संकट सोडवण्यास मदत होईल. रिलायन्स कम्युनिकेशन्सला दीर्घ प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. अनिल अंबानींची ही टेलिकम्युनिकेशन कंपनी बऱ्याच दिवसांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. आता एनसीएलटीच्या निर्णयामुळे न्यायाधिकरणाला आर्थिक पुनर्रचनेच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास परत येईल आणि व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होईल.

रिलायन्स पॉवर कर्जमुक्त, रिलायन्स इन्फ्राचेही कर्ज झालेअनिल अंबानींची रिलायन्स पॉवर कंपनी कर्जतून झाली आहे. तर, रिलायन्स इन्फ्रा कर्जमुक्त होण्याच्या दिशेने आहे. रिलायन्स इन्फ्रावरील कर्ज फक्त 475 कोटी रुपयांवर आले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने 3000 कोटींहून अधिक निधी उभारण्याची तयारी केली आहे. यामुळे रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राचे शेअर्सही वेगाने वाढत आहेत. स्टॉकमध्ये सतत अपर सर्किट्स दिसत आहेत.

गौतम अदानींशी व्यवहार करणारअनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवर अदानी समूहासोबत मोठा करार करू शकते. रिलायन्स पॉवरचा बुटीबोरी, नागपूर येथे 600 मेगावॅटचा वीज प्रकल्प आहे. या वीज प्रकल्पावर अदानी समूहाचा डोळा असल्याचे मानले जात आहे. मुंबईला वीजपुरवठा करण्यात या पॉवर प्लांटचा मोठा वाटा आहे. मात्र, या डीलबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र गेल्या काही काळापासून ही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सरिलायन्स कम्युनिकेशनव्यवसायगुंतवणूक