मुंबई : देशातील प्रमुख उद्योगपती कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबातील एक सदस्य अऩिल अंबानी सध्या अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. चीनमधील एका बॅंकेने अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी)मध्ये याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. चायना डेव्हलपमेंट बॅंकेने (CDB) अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, रिलायन्स कम्यूनिकेशनचे शेअर मंगळवारी(28 नोव्हेंबर) 3.37 टक्क्यांपर्यंत पडले.
रिलायन्स कम्यूनिकेशनने व्यक्त केलं आश्चर्य -
मात्र, बीएसईला माहिती देताना रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने कंपनीला अशाप्रकारे कोणतीच नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. हे वृत्त केवळ मीडियामध्येच सुरू आहे. सर्व शेअरधारकांचं हित लक्षात घेऊन कंपनी जॉइंट लेंडर्स फोरम (JLF) सोबत काम करत आहे, तसंच चायना डेव्हलपमेंट बॅंक देखील जेएलएफमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे, असं प्रवक्ता पुढे म्हणाले. पण टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सीडीबीने उचललेल्या पावलावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
1.78 अब्ज डॉलरचं कर्ज -
आरकॉम अनिल अंबानी ग्रुपचा भाग आहे. आरकॉमला चायना डेव्हलपमेंट बॅंकेने 1.78 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं होतं. जवळपास 6 वर्षांपूर्वी सिंडीकेट ऑफ चायनीज बॅंक आणि अन्य संस्थांनी हे कर्ज 10 वर्षांसाठी दिलं होतं, यामध्ये सीडीबीचाही समावेश होता. सिंडीकेटने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याची ती पहिलीच वेळ होती असं सांगितलं जातंय. यासोबतच आरकॉमने 600 मिलियन डॉलरचा अतिरिक्त करार सीडीबीसोबत केला होता. पण कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे आऱकॉम विरोधात एनसीएलटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीत, चिनी बॅंकेने दाखल केली याचिका
देशातील प्रमुख उद्योगपती कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबातील एक सदस्य अनिल अंबानी सध्या अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 11:29 AM2017-11-29T11:29:41+5:302017-11-29T12:40:56+5:30