मुंबई : थकीत कर्जापोटी अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची प्रक्रिया येस बँकेने सुरू केली आहे. हे मुख्यालय विकून टाकणे अथवा आपले कार्यालय तेथे हलविणे असे दोन पर्याय बँकेसमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे येस बँकेचे २,८९२ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सारफाएसी कायद्यान्वये कारवाई करताना बँकेने या इमारतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन महिन्यांची आगावू नोटीस देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार या कायद्यान्वये बँकांना मिळाला आहे.
अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 3:17 AM