Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली...

अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली...

एकेकाळी 2514 रुपयांवर असणारा शेअर 99% घसरला होता. आता या शेअरने रॉकेट वेग पकडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:12 PM2024-07-31T19:12:05+5:302024-07-31T19:13:08+5:30

एकेकाळी 2514 रुपयांवर असणारा शेअर 99% घसरला होता. आता या शेअरने रॉकेट वेग पकडला आहे.

Anil Ambani's Reliacne Infra shares recover from 99% fall; Now the price has crossed Rs 200 | अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली...

अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली...

Anil Ambani News : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांपासून रॉकेट वेगाने वाढत आहेत. Reliance Infrastructure चे या काळात 13 टक्क्यांनी वधारले आहेत. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी हा शेअर त्याच्या उच्च पातळीपासून 99% घसरला होता. मात्र, आता यात पुन्हा वेगाने वाढ होत असून, मंगळवारी(दि.30) त्याची किंमत पुन्हा एकदा 200+ पोहोचली आहे. 

शेअर 207 रुपयांच्या पातळीवर 
मंगळवारी या शेअरने बाजार उघडताच 200 रुपयांचा टप्पा ओलांडला होता आणि सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 205.60 रुपयांवर पोहोचला होता. पण, पुढे त्याचा वेग मंदावला बाजार बंद होईपर्यंत तो रु. 200.75 च्या पातळीवर बंद झाला. यानंतर बुधवारी रिलायन्स इन्फ्रा शेअरने जोरदार वाढ घेतली. दिवसभरातील ट्रेडिंगदरम्यान हा शेअर 3.66 टक्क्यांच्या वाढीसह 209 रुपयांवर पोहोचला. मात्र, बाजार बंद होईपर्यंत तो 2.85 टक्क्यांच्या वाढीसह 207 रुपयांवर आला. 

कंपनीचे मार्केट कॅप वाढले
Reliacne Infra Share च्या शेअर्सच्या वाढीमुळे मार्केट कॅपदेखील 8,200 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसात या शेअरची किंमत 12.64 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, हा शेअर 200 रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा शेअर बाजारातील तज्ज्ञांना आधीच होती. 

99% पेक्षा जास्त घसरल्यानंतर दमदार पुनरागमन
अनिल अंबानी यांच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये 99 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर या शेअरने दमदार पुनरागमन केले आहे. जर आपण त्याचा रेकॉर्ड पाहिला तर, 4 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्रा शेअरची किंमत 2514.35 रुपये होती, परंतु 10 जानेवारी 2020 रोजी हा जवळपास 99% घसरुन 24.90 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर त्यात हळूहळू वाढ झाली आणि आज याने 200 चा टप्पा ओलांडला आहे.

पाच वर्षांत पैसा चौपट
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले असले तरी, हा शेअर पाच वर्षांत गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. अनिल अंबानींच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत तब्बल 306.49 टक्के परतावा मिळाला आहे. 2 ऑगस्ट 2019 रोजी शेअरची किंमत 50 रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत ठेवले असतील, तर त्याची 1 लाख रुपयांची रक्कम आता वाढून 4 लाख रुपये झाली असेल.

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Anil Ambani's Reliacne Infra shares recover from 99% fall; Now the price has crossed Rs 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.