शेअर बाजारात विक्रीची स्थिती असतानाच अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. आठवड्यातील ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे.
ट्रेडिंगदरम्यान शेअरचा भाव 128 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचे मार्केट कॅप 4,432.55 कोटी रुपये एवढे आहे. तसेच या कंपनीने 2 सप्टेंबर 2022 रोजी 201.35 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता. ही 52 आठवड्यांतील शेअरची उच्च पातळी आहे. तसेच 20 जून 2022 रोजी शेअरने 81.10 रुपयांच्या 52 आठवड्यांतील लो लेव्हलला स्पर्श केला होता.
असे होते डिसेंबर तिमाहीतील परिणाम -
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर चा घाटा डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 267.46 कोटी एवढा होता. एक वर्ष आधी याच तिमाहीत कंपनीचा घाटा 125.56 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीची विक्री 4,085.82 कोटी होती, जी एकवर्ष आधी याच अवधीच्या तुलनेत 2.76% कमी आहे. डिसेंबर 2021 मध्ये 4,201.99 कोटी रुपयांची विक्री होती.
किती दिला परतावा? -
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 9.92 टक्क्यांच्या निगेटिव्ह परतावा दिला आहे. तसेच, तीन महिन्यांत 14.28 टक्क्यांची, तसेच एका महिन्यात 4.73 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. याच बरोबर एक वर्षाचा कालावधी पाहता, स्टॉकने 23.47 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत शेअरमध्ये 296.69 टक्के आणि तीन वर्षांत 450 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)