Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवरला सरकारी कंपनीने खरेदी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 05:08 PM2024-01-02T17:08:29+5:302024-01-02T17:09:46+5:30

अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवरला सरकारी कंपनीने खरेदी केले आहे.

Anil Ambani's reliance power ltd; THDC india ltd acquired this company | अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

Anil Ambani: एके काळी अनिल अंबानी (Anil Ambani), हे नाव भारतीय औद्योगिक जगताचा चमकता तारा होता. मात्र गेल्या काही वर्षांत हा तारा निखळून पडलाय. अनिल अंबानी यांच्या सर्व कंपन्या अडचणीत आल्या आहेत. एक-एक करत त्यांच्या कंपन्यांची विक्री होतीय. त्यांनी स्वतःही आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे. अशातच आता त्यांनी सरकारसोबत एक डील केल्याची माहिती समोर आली आहे. 

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि THDC इंडिया लिमिटेड यांच्यात करार झाला आहे. रिलायन्स पॉवरने अरुणाचल प्रदेशातील आपला 1,200 मेगावॅट कलाई-2 जलविद्युत प्रकल्प सरकारी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतलाय. हा करार एकूण 128.39 कोटी रुपयांचा आहे. 35 वर्षे जुनी THDC India Limited ही NTPC च्या मालकीची आहे. तर, कलाई पॉवर लिमिटेड, ही रिलायन्स पॉवरच्या उपकंपन्यांपैकी एक आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुणाचल प्रदेश सरकार, कलाई पॉवर आणि THDC इंडिया लिमिटेड, यांनी 30 डिसेंबर 2023 रोजीच या करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, अरुणाचल प्रदेशातील लोहित नदी खोऱ्यावर असलेल्या प्रस्तावित 1,200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई-II जलविद्युत प्रकल्पाचे हक्क आणि संबंधित भौतिक मालमत्ता THDC कडे हस्तांतरित केली जाईल. 

रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले
या डीलनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे. काल(दि.1) 23.95 रुपयांवर असलेला सेअर आजच्या दिवसाचा व्यवहार संपेपर्यंत कंपनीचे शेअर्स 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 24.05 रुपयांवर व्यवहार करत आहेत. ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सने 24.44 रुपयांचा उच्चांक गाठला होता. 

Web Title: Anil Ambani's reliance power ltd; THDC india ltd acquired this company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.